संग्रहित छायाचित्र esakal
सातारा

निसराळेत दोघा भावांवर चाकूहल्ला

या वेळी घटनास्थळावरून पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली एक स्कॉर्पिओ व एक दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेतली. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत या घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते.

- विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : निसराळे (ता. सातारा) (Nisrale) येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांवर चाकूसारख्या हत्याराने (Wepoan) वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. निसराळे येथे शनिवारी सायंकाळी भररस्त्यातच ही घटना घडली. सचिन साहेबराव घोरपडे व सोमनाथ साहेबराव घोरपडे अशी या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. (satara crime news nisrale police)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निसराळे येथील सचिन साहेबराव घोरपडे, सोमनाथ साहेबराव घोरपडे व त्यांचा संशयित चुलत भाऊ यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद होता. याच वादातून संशयित चुलत भावाने शनिवारी सकाळी सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे यांच्याविरुद्ध बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे हे बंधू चौकशीसाठी निसराळे गावातील मुख्य रस्त्याने बोरगावकडे निघाले असतानाच संशयित चुलत भाऊ, त्याचा सातारा येथील भाचा व भाच्याचे तीन ते चार साथीदार यांनी त्यांना अडवून त्यांच्याशी भांडू लागले. हे भांडण पाहून गावातील काही ग्रामस्थांनी याची माहिती बोरगाव पोलिसांना दिली.

सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ तत्काळ कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळाकडे रवानाही झाले. वाद विकोपाला जाऊन संशयितांनी दोन्ही भावांवर चाकूसारख्या धारदार हत्याराने पोटात, छातीवर व पाठीवर वार करून लाकडी दांडक्‍याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी पोलिस घटनास्थळी पोचल्यावर हल्लेखोर पळून जाऊ लागले. या वेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून हल्लेखोरांपैकी दोघांना जेरबंद केले. अन्य संशयित पळून जाण्याचा यशस्वी झाले. पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या दोन्ही भावांना उपचारासाठी सातारा येथे पाठवले.

या वेळी घटनास्थळावरून पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली एक स्कॉर्पिओ व एक दुचाकी घटनास्थळावरून ताब्यात घेतली. सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत या घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT