Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाडात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार; अपशिंगेच्या एकास सक्तमजुरी

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षांची सक्तमजुरीसह 54 हजारांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी आज ठोठावली. दयानंद सदाशिव साठे (रा. अपशिंगे, ता. कडेगाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

सरकार पक्षातर्फे ऍड. आर. सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत असताना साठेने तिला फूस लावून पळवून नले. निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. शहर पोलिस ठाण्यात साठेवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यासह गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांनी त्याचा तपास केला. त्याचे आरोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश औटी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे ऍड. शहा यांनी काम पाहिले. त्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले. 

त्यात पीडित मुलीच्या जबाबासह परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून संशयित साठेला गुन्ह्यात दोषी धरून शिक्षा ठोठावली. वेगवेगळ्या कलमानुसार झालेल्या शिक्षेत पालकांच्या निगराणी खालून अल्पवयीन मुलीस पळवल्याबद्दल तीन सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, धमकावल्याबद्दल एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये तीन वर्ष सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. हवालदार गोविंद माने, हवालदार अशोक मदने, कार्वेकर, पवार यांनी पैरवी अधिकारी काम पाहिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT