Satara Latest Marathi News 
सातारा

कोरेगाव, पुसेगावात पोलिसांचा धडक छापा; गुटखाप्रकरणी निढळ, नेरमधील तिघांना अटक

राजेंद्र वाघ I सलीम आत्तार

कोरेगाव/पुसेगाव (जि. सातारा) : कोरेगाव व पुसेगाव पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा घालून एका दुचाकीसह सुमारे तीन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलिसांनी कोरेगाव येथील एकास आणि पुसेगाव पोलिसांनी निढळ व नेर (ता. खटाव) येथील दोघांना अटक केली आहे. 

पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमील शफिक बागवान (रा. कळकाई गल्ली, कोरेगाव) आणि सिद्धार्थ संजय भिसे (रा. निढळ, ता. खटाव) व आनंदा रामचंद्र चव्हाण (रा. नेर, ता. खटाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की कोरेगाव- पुसेगाव मार्गावरून अवैधरीत्या गुटखा, पानमसाल्याची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांच्या आदेशावरून अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, कोरेगावचे उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचे निरीक्षक पी. एम. मोरे, उपनिरीक्षक विशाल कदम, सहायक फौजदार पाटोळे, कॉन्स्टेबल झारी, वाघमळे यांनी काल रात्री साडेनऊच्या सुमारास कुमठे फाटा (कोरेगाव) येथे एका विना क्रमांकाच्या दुचाकीची तपासणी केली असता चालक जमील शफिक बागवान (रा. कळकाई गल्ली, कोरेगाव) याच्या कब्जात गुटखा पानमसाला, सुगंधी सुपारी, तंबाखू आढळून आली. 

या पदार्थांचे उत्पादन, साठा, वितरणावर बंदी असतानाही यासंदर्भातील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित जमील बागवान यास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातील दुचाकीसह 94 हजार 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी युवराज तात्याबा ढेंबरे (अन्न व औषध प्रशासन विभाग, सदरबाझार, सातारा) यांनी फिर्याद दिली असून, पोलिस निरीक्षक मोरे तपास करत आहेत. त्याचबरोबर पुसेगाव येथेही अवैधरीत्या गुटखा, पान मसाला, सुगंधी सुपारी, तंबाखूचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उपअधीक्षक किंद्रे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक लोंढे, पोलिस कॉन्स्टेबल मुल्ला यांनी पुसेगाव येथील सचिन ज्वेलर्स शेजारील सलून दुकानामध्ये काल रात्री अचानक छापा घातला असता, त्या ठिकाणी एक लाख 98 हजार रुपये किमतीचा तंबाखू, गुटखा, आरएमडी पानमसाला, गोल्ड सेंटेड तंबाखू असा माल आढळून आला. यासंदर्भात अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता गणपत गायकवाड (अन्न व औषध प्रशासन विभाग, सदरबझार, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ भिसे (रा. निढळ, ता. खटाव) व आनंदा चव्हाण (रा. नेर, ता. खटाव) यांच्यावर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपअधीक्षक किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. बी. लोंढे तपास करत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT