crime esakal
सातारा

धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून

दरम्यान, हा प्रकार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे, उपनिरीक्षक सागर अरगडे व वृषाली देसाईसह सर्व पोलिस कर्मचारी व गुन्हे अन्वेषणचे धुमाळ, तसेच ठसे तज्ज्ञ येथे तत्काळ हजर झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी पोलिस करत होते.

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : नायगाव (ता. खंडाळा) येथे प्रशांत चन्नपा जामदार (मूळ रा. बिगदगुडेवाडी, ता. कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) या आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलास डोक्‍यालाही मार लागला आहे. साेमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक घटनास्थळी ठाण मांडून तपास करत होते.

याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले, की नायगाव येथील प्रशांत गुजर यांच्याकडे कर्नाटक राज्यातील हे कुटुंब शेतावर कामाला होते. आईवडील शेतावर काम करत असताना फळाच्या पॅकिंगसाठी पेपरची रद्दी आणायला हा मुलगा घरी आला होता. जामदर यांच्या राहत्या घराशेजारील पपईच्या बागेत मुलाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या घटनेचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.

दरम्यान, हा प्रकार साेमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला. यानंतर पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश हजारे, उपनिरीक्षक सागर अरगडे व वृषाली देसाईसह सर्व पोलिस कर्मचारी व गुन्हे अन्वेषणचे धुमाळ, तसेच ठसे तज्ज्ञ येथे तत्काळ हजर झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची चौकशी पोलिस करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT