Satara Latest Marathi News 
सातारा

मैत्रिणीकडे अभ्यासासाठी निघालेल्या नम्रतावर काळाचा घाला; ट्रॅक्‍टरच्या धडकेत विद्यार्थिनी जागीच ठार

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : रेठरे खुर्द येथे आज दुपारी मैत्रिणीकडे अभ्यासासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर काळाने घाला घातला. उसाच्या वाड्यांची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्‍टरने वेगाने येऊन धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना समजल्यानंतर परिसरासह गाव हादरला. नम्रता आकाराम मोहिते (वय 14) असे अपघातात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. अपघात घडल्यानंतर वाहनचालक मोहन गणपती घोडके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची कऱ्हाड ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे. 

रेठरे बुद्रुक ते वाठार मार्गावर रेठरे खुर्द येथील श्री बिरोबा मंदिरासमोर हा अपघात घडला. दुपारी तीन वाजता नम्रता मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी निघाली होती. त्याचवेळेस तिच्या पाठीमागून वाठारच्या दिशेने उसाच्या वाड्याने भरलेला ट्रॅक्‍टर (एमएच 10 एच 1436) वेगाने आला. काही कळायच्या आतच ट्रॅक्‍टरने तिला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती, की ती जागीच ठार झाली. 

घटनेनंतर ट्रॅक्‍टर विजेच्या खांबावर जाऊन धडकल्याने खांब पूर्णतः मोडला. गावातील वीज प्रवाह खंडित झाला. नम्रता ही जाई मोहिते प्रशालेत इयत्ता आठवीत शिकत होती. शांत स्वभाव असल्याने ती सर्वांची आवडती होती. तिचे वडील आकाराम मोहिते कऱ्हाड येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. तिच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. तिच्या मागे आई, वडील, चुलते, भाऊ, भावजय असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी नवी मोकळी जागा! ५०० एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करणार; राज्य सरकारची दमदार घोषणा

Pune Police action Video : पुणे पोलिस ‘अ‍ॅक्शन मोड’वर! कोयता गँगला चोपल्यानंतर, आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड!

Latest Marathi News Live Update: गोवा आणि कोकणापलीकडेही समाजसेवेचा वारसा

SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला

Explained: च्यवनप्राशमधील आयुर्वेदिक घटक शरीराला कसे देतात ताकद? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT