Satara Latest Marathi News 
सातारा

पुणे-सातारा लेनवरील उड्डाणपुलावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत तीन ठार

पुरुषोत्तम ढेरे

कवठे (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावरील सुरूर (ता. वाई) येथे पुणे-सातारा लेनवरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास कारने पाठीमागून मालट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुरूर हद्दीतील महामार्गावरील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा लेनवर ट्रकचा (एमएच 12 पी क्‍यू 6846) उजव्या बाजूचा पुढील टायर फुटल्याने मालट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उभा होता. या उभ्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने (एमएच 04 जी डी 1205) जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक अजय राजेंद्र सुतार (वय 26) व केदार दत्तात्रय वेल्लाळ (वय 25, दोघेही रा. मसूर , ता. कऱ्हाड) हे जागीच ठार झाले. कारमधील सुजित रामचंद्र आवटे (वय 42, बनवडी ता. कऱ्हाड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशोक कांबळे (वय 35, रा. कऱ्हाड) हा गंभीर जखमी झाला. कारची धडक एवढी जोरदार होती, की अर्ध्याहून अधिक कारची पुढील बाजू ट्रकच्या पाठीमागील बाजूस घुसली होती. त्यामुळे कारचालक अजय सुतार व शेजारी बसलेले केदार वेल्लाळ हे जागीच ठार झाले.

या अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एस. के. पोवार व त्यांचे कर्मचारी तसेच भुईंज पोलिस केंद्राचे कर्मचारी तेथे हजर झाले. अपघातामुळे महामार्गावरून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळित झाली. पोलिसांनी गंभीर जखमींना सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये, तर ठार झालेल्यांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार व ट्रक क्रेनच्या सहायाने बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT