Satara Latest Marathi News 
सातारा

हनीट्रॅप टोळीतील बारामतीच्या तिघांना अटक; प्रेमाच्या जाळ्यात ओढून साताऱ्यातील एकाला लुबाडले

गिरीश चव्हाण

सातारा : फेसबुक, व्हॉटसऍपव्दारे प्रेमाच्या जाळ्यात ओढत साताऱ्यातील एकास लुटल्याप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यात सातारा तालुका पोलिसांनी एका युवतीसह बारामती तालुक्‍यातील करावागज येथील तिघांना आज अटक केली. 

समाजमाध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढत लुटमारीचे प्रकार पुणे जिल्ह्यात घडले होते. अशाच पध्दतीने डिसेंबर महिन्यात साताऱ्यातील एकास ठोसेघर परिसरात बोलावून लुटण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तपासाच्या सुचना सातारा तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना दिल्या होत्या. त्यांनी उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, राजेंद्र वंजारी, मालोजी चव्हाण, विश्‍वनाथ आंब्राळे यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाने पुणे तसेच बारामती परिसरात या टोळीचा शोध घेण्याचे काम सुरु केले. शोधादरम्यान त्यांनी बारामती (जि.पुणे) येथील करावागज गावातून वैभव प्रकाश नाळे (वय 28) आणि अजिंक्‍य रावसाहेब नाळे (वय 23) या दोघांना ताब्यात घेतले. 

चौकशीत त्यांनी सातारा तालुक्‍यातील ठोसेघर येथे गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात एकास बोलावून त्याच्याकडील सोने, चारचाकी, रोकड सुटल्याचे तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केल्याची कबुली दिली. चौकशीत त्यांनी महिला साथीदाराचे नाव सांगितले. यानुसार पोलिसांनी हवेली (जि.पुणे) येथील थेउर परिसरातून 28 वर्षीय युवतीस ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी फेसबुक, व्हॉटसऍपवर ओळख काढत त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून बारामती परिसरातील अनेकांना लुटल्याची कबुली दिली आहे. कारवाईत सहभागी झालेल्यांचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक अधीक्षक आंचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT