Satara Latest Marathi News 
सातारा

सैदापुरात दुचाकींच्या धडकेत विरमोड-कळंबेचे दोघे ठार

गिरीश चव्हाण

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथे काल रात्री दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. गिरीश प्रकाश सोनावणे (वय 39, रा. विरमाडे, ता. वाई, हल्ली रा. तामजाईनगर, कंरजे) आणि रुपेश रामचंद्र राठोड (वय 35, मुळ रा. चिंचणी, अक्कलकोट, हल्ली रा. कळंबे, ता. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबतची माहिती अशी, विरमाडे (ता. वाई) येथील गिरीश प्रकाश सोनावणे हे साताऱ्यातील करंजे येथील तामजाईनगरात राहण्यास होते. ते काल रात्री साडेआठच्या सुमारास वर्ये येथून दुचाकीवरुन साताराबाजूकडे येत होते. सैदापूर येथे आले असतानाच सोनावणे यांच्या दुचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीस जोराची धडक दिली. यात सोनावणे आणि दुसऱ्या दुचाकीवरील रुपेश राठोड हे जखमी झाले. या जखमींना नंतर पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

याठिकाणच्या वैद्यकीय तपासणीअंती सोनावणे आणि राठोड या दोघांना मृत घोषित करण्यात आले. सोनावणे यांच्याजवळ सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी अपघाताची माहिती त्यांच्या विरमाडे येथील नातेवाईकांना दिली. याची फिर्याद धनंजय प्रकाश सोनावणे (रा. विरमाडे) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. तपास हवालदार महांगडे हे करीत आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टाने रद्द केला उच्च न्यायालयाचा निकाल, अचानक उलटला खेळ… सगळेच झाले थक्क!

"आता मला माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचंय" आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचा मोठा निर्णय "वर्षातून एक सिनेमा.. "

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

SCROLL FOR NEXT