Satara Latest Marathi News 
सातारा

चुलत भावांवर काळाचा घाला; भोर-नीरेला जाणाऱ्या एसटीच्या धडकेत खंडाळ्यातील दोघांचा मृत्यू

अशपाक पटेल

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ-लोणंद रस्त्यावरील फुलोरा सोसायटीजवळ भोर-नीराला जाणारी एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात लोणी (ता. खंडाळा) येथील दोन चुलत भाऊ जागीच ठार झाले असून, एक युवक गंभीर जखमी झाला. 

या अपघातात कृणाल संजय चव्हाण (वय 18) व आदित्य देविदास चव्हाण (वय 14) हे जागीच ठार झाले. ओंकार संजय भोसले (वय 18) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी सांगितले, की शिरवळवरून सकाळी दहा वाजता निघालेली भोर-नीरा ही एसटी बस फुलोरा सोसायटीजवळून जाताना दुभाजक रस्त्यावरून अचानक वन वे होणाऱ्या रस्त्यावर आली असता एसटीला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार (एमएच 11 सीवाय 4836) हा समोरून जात असलेल्या हातगाडीच्या कोपऱ्याला धडकला. त्या वेळी एसटीच्या मागील चाकाखाली हे दोन्ही दुचाकीस्वार आले. या वेळी या युवकांच्या डोक्‍यावरून चाक गेल्याने व गंभीर दुखापत झाल्याने कृणाल चव्हाण व आदित्य चव्हाण हे दोन्ही शाळकरी मुले ठार झाले. 

दुचाकीवर पाठीमागे तिसरा बसलेला युवक हा जखमी झाला. कृणाल हा चिपळूण (जि. रत्नागिरी) येथे 11 वीला असल्याने त्यास सोडण्यासाठी ओंकार व आदित्य लोणीवरून शिरवळला जात होते. या वेळी हा अपघात झाला. आदित्य हा शेजारीच असलेल्या भोळी येथील हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. या शाळकरी मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. एसटीचालक अजित तुकाराम गायकवाड (रा. बालवडी, ता. भोर ) यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस वृषाली देसाई करत आहेत. 

लोणी गावावर शोककळा 

देविदास व संजय चव्हाण हे दोघे सख्खे भाऊ असून, त्यांची दोन्ही एकुलते एक मुले कृणाल व आदित्य यांचा अपघातात मृत्यू झाल्याने लोणी गावावर मोठी शोककळा पसरली. चव्हाण कुटुंबीयावर आभाळच कोसळले. या दोन्ही सख्या चुलत भावांच्या अंत्यविधीवेळी चव्हाण कुटुंबाने फोडलेला टाहो हृदय हेलवणारा होता. यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चाकणकरांवर टीका, पक्षानं धाडली नोटीस; रूपाली ठोंबरे म्हणाल्या, वेळ खूपच कमी

Latest Marathi News Live Update : रूपाली पाटील ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

Leopard Attack : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप तरुणाचा बळी? लोहशिंगवेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Raisin Rate Hike : दिवाळीनंतर बेदाण्याला उच्चांकी दर, एका किलोला तब्बल ४१० रुपये मिळाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान

Railway Employees Protest: रेल्वे आंदोलन परवानगीशिवाय! अहवाल मागवला; कारवाई होणार

SCROLL FOR NEXT