कोरोना 
सातारा

शिरवळ आजपासून सात दिवस बंद : नागरिकांचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

खंडाळा (जि. सातारा) : कोरोनाचा शिरवळमध्ये वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून सात दिवस शिरवळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. रविवारी दिवसभर शिरवळ शहरातील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत 65 जणांना शिरवळ येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तर त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत संशयित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

शिरवळ शहरातील कोरोनाबाधित सापडलेल्या तिघांपैकी दोघांना सातारा येथे तर एकास वाई येथे ठेवण्यात आले आहे. यामधील एकास श्वसन विकाराचा त्रास जाणवू लागला होता. या दोघांनी पुणे येथून ये-जा केले होते, असे सांगण्यात आले. 

गेले दहा दिवस एकही कोरोनाग्रस्त रुग्ण न सापडल्याने तालुक्‍यातील जनतेने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत पाच जण कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा प्रशासनासह नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT