सातारा

मंत्री महाेदयांचे साताऱ्यात आवाहन; उद्योजकांनी परतलेल्या मुंबई, पुणेकरांना रोजगार द्या

सकाळ वृत्तसेवा

सातारा :  कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यामुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद करण्यात आल्यामुळे मुंबई, पुणे व पराज्यात काम करणारे मुळचे सातारा जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. त्यांना जिल्ह्यातच काम मिळावे अशी अपेक्षा आहे, तरी उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घेऊन स्थानिकांनाच रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे आज (गुरुवार) केले.

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते, याचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृह (ग्रामीण) तथा कौशल्य विकास राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदिप रोकडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सचिन धुमाळ यांच्यासह उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे आज उद्योग क्षेत्र काही प्रमाणात अडचणीत आले आहेत, हे क्षेत्र पुन्हा उभे राहिले पाहिजे, ही शासनाची भूमिका असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, मुंबई ही राज्याची तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईत सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात कामासाठी गेले होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते परत आपल्या जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही, त्यामुळे कोणतेही काम करण्याची मानसिकता तयार झाली आहे. आज आणि उद्या होणाऱ्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योजकांनी स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कौशल्य विकास विभागाने स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार कशा प्रकारे मिळेल यासाठी आराखडा तयार केला होता, पण कोरोनाच्या संसर्गामुळे हा आराखडा राबविण्यास अडचणी निर्माण झाल्या, मात्र तयार करण्यात आलेला आारखडा भविष्यात राबविण्यात येणार आहे. आज मुंबई, पुणे येथून नागरिक आपल्या जिल्ह्यात परत आले आहेत त्यांना गावाकडेच काम मिळावे अशी अपेक्षा ते व्यक्त करत आहेत. याचा लाभ उद्योजकांनी घेऊन एक पाऊल पुढे येऊन भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी केले.

एक हजार 277 जागांसाठी आज आणि उद्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. या जागांसाठी जिल्ह्यातून चार हजार 500 जणांची नोंदणी केलेली आहे. या पुढे उद्योगांना कामगारांची गरज असल्यास त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर जावून किती कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी. उद्योजकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगारांना रोजगार मिळेल हा हेतू ठेवावा, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

उद्योजकांनी केले प्रशासनाचे कौतुक

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील उद्योग बंद पडले होते. या काळात प्रशासनाने उद्योगाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच  या कठीण काळात वेळोवेळी मार्गदर्शन करुन लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्यानंतर उद्योग सुरु करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन दिला जाईल, असे विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री श्री. पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांच्या हस्ते काही जणांना प्राधमिक स्वरुपात नियुक्ती पत्रांचेही वाटप करण्यात आले.

सहकारी संस्थांच्या संचालकांना ‘महाविकास’चा सत्ता बोनस... 

महाविकास आघाडीतील हे मंत्री म्हणतात, पृथ्वीराज चव्हाणांचे स्वप्न पूर्ण करू

वनविभागाची माेठी कारवाई; साताऱ्यात 12 शिकारी ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT