Satara 
सातारा

नवीन विंचवाचा फलटणमध्ये शोध, "निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस' असे नामकरण

दीपक मदने

सांगवी (जि. सातारा) : वन्यजीव संशोधकांनी नुकताच फलटण तालुक्‍यातून नवीन विंचवाच्या जातीचा शोध लावला आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये या कुळातील चारच जातींची नोंद होती. फलटणमध्ये आढळलेल्या या नवीन विंचवाचे नाव फलटण या नावावरून "निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस' (Neoscorpiops Phaltanensis) असे ठेवण्यात आले आहे. 

वन्यजीव अभ्यासक, संशोधक आणि वाईल्ड लाइफ प्रोटेक्‍शन ऍन्ड रिसर्च सोसायटीच्या अमित सय्यद यांनी सातारा जिल्ह्यामध्ये असणारी जैवविविधता अभ्यासण्यासाठी 2008 पासून प्रारंभ केला. या अभ्यासातून 2016 मध्ये जिल्ह्यातून एकूण 677 प्राण्यांची नोंद केली होती. अभ्यासासाठी त्यांनी तीन वर्षे परिश्रम घेतले. अभ्यासात फुलपाखरे, कोळी, विंचू, साप, पाली, सरडे, पक्षी तसेच विविध जातींच्या सस्तन प्राण्यांचा समावेश होता. अभ्यासादरम्यान वन्य जिवांवर संशोधन करताना त्यांना ही विंचवाची जात नवीन असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. नंतर त्यांनी व वाईल्ड लाइफ प्रोटेक्‍शन ऍन्ड रिसर्च सोसायटीचे सदस्य अभिजित नाळे, सचिन जाधव, मंगेश कर्वे, अभिजित निकाळजे, ऋषिकेश शिंदे, अफजल खान, किरण अहिरे, ऋषिकेश आवळे यांनी फलटण तालुक्‍यामध्ये शोधकार्य सुरू केले. त्यात हा विंचू आढळला. 
भारतात विंचवाच्या कुळातील केवळ चार जाती आढळत होत्या. नवीन विंचवाचा शोध लागल्याने या जातींत भर पडली आहे. निओस्कॉरपिओपस फलटणेन्सीस (Neoscorpiops Phaltanensis) असे या जातीचे नाव फलटण नावावरून ठेवण्यात आले आहे. याची विशेषत: म्हणजे हा विंचू फलटण सोडून भारतात इतरत्र कोठेही आढळत नसल्याचे दिसून येत आहे. हा विंचू फलटणमध्ये फक्त आसराई देवीच्या डोंगरकपारीत आढळतो. नवीन जातीच्या संशोधनाचा शोधनिबंध BNHS या आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. या नवीन जातीच्या संशोधनामध्ये वन्यजीव संशोधक डॉ. सय्यद यांच्यासह शौरी सुलाखे, आनंद पाध्ये, देशभूषण बस्तावडे, निखिल दांडेकर यांनी योगदान दिले. 

जैवविविधतेत फलटणचे महत्त्व वाढले 

फलटण भागामधून पहिल्यांदा नवीन प्रजातीचा शोध लागल्याने जैवविविधतेत फलटणचे महत्त्व वाढले आहे. विंचवाच्या या नवीन जातीच्या शोधामुळे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनानेही त्याचे जतन करण्यास महत्त्व दिले पाहिजे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोरच्या दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT