खोलीतील कपाटातील साहित्य त्यांनी अस्ताव्यस्त केले. sakal
सातारा

सातारा : मसूरला दरोडा डॉक्टर दांपत्याला मारहाण पाच लाखांचे दागिने लंपास

तेथे सापडलेले दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला

संतोष चव्हाण

उंब्रज : मसूर (ता. कऱ्हाड) येथे मध्यरात्रीनंतर उशिरा डॉक्टर दांपत्यास बेदम मारहाण करून त्यांच्या घरावर दरोडा टाकत चोरट्यांनी रोख रकमेसह पाच लाखांचे दागिने लंपास केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत हिराप्पा वारे (वय ५०) व डॉ. अनिता संपत वारे (४८, दोघेही मूळ रा. कालगाव, सध्या मसूर) अशी जखमी डॉक्टर दांपत्याची नावे आहेत. या घटनेने मसूरसह उंब्रज परिसरही हादरला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील माहितीनुसार तपासास सुरवात केली आहे. स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचेही पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानुसार तीन पथके वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहेत.

पोलिसांसह घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार, मसूर-शामगाव रस्त्यावर पहाटेच्या सुमारास संतोषीमातानगरात या दरोड्याचा थरार घडला. तेथील नवीन गावठाणात डॉ. संपत वारे यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडेखोरांनी धुडगुस घातला. घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी डॉ. वारे यांच्यासह डॉ. अनिता यांना बेदम मारहाण केली. बंगल्यात शिरलेल्या दरोडेखोरांनी अन्य खोल्या बाहेरून बंद केल्या. मुख्य खोलीत डॉ. वारे व त्यांच्या पत्नी होत्या. त्या खोलीतील कपाटातील साहित्य त्यांनी अस्ताव्यस्त केले. तेथे सापडलेले दागिने व रोख रक्कम लुटून पोबारा केला. त्यावेळी विरोध केल्याने डॉक्टर दांपत्यास बेदम मारहाण केली. दोघांनाही सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

उजाडल्यानंतर ही घटना समोर आली. घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाचा तपासात फारसा उपयोग झाला नाही. श्‍‍वान तेथेच घुटमळल्याने दरोड्यात मोठ्या वाहनाचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ठसे तज्ज्ञांनाही तेथे वेगळे ठसे आढळले नाहीत. दरोडेखोरांनीही हातमोजे घातल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

असा गेला ऐवज

डॉ. वारे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोड्यात सुमारे पाच लाखांचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली आहे. त्यात ४५ हजारांचे सोन्याचे मिनी गंठण, १५ हजारांचे कानातील दोन टॉप्स, ९० हजारांचे सोन्याचे गंठण, ९० हजारांची सोनसाखळी, ६० हजारांचे गंठण, १५ हजारांच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १५ हजारांची सोनसाखळी, १५ हजारांच्या अंगठ्या, ३० हजारांचे सोन्याचे मिनी गंठण, १५ हजारांच्या कानातील सोन्याच्या रिंगा, ९० हजारांची मोहनमाळ, नऊ हजारांची रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT