शंभूराज देसाई  
सातारा

गरजले शंभूराज... प्रतिबंधित क्षेत्रात लोकांची गैरसोय नको

सकाळ वृत्तसेवा

तांबवे (जि. सातारा) : सुपनेत तीन दिवसांपूर्वी एक महिला कोरोनाबाधित झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज मंत्री देसाई यांनी सुपने गावात भेट देवून संबंधित ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्रकाश पाटील, सरपंच अशोक झिंब्रे, उपसरपंच, सुपने आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा हुंदरे, मंडलाधिकारी नवींद्र भांदिर्गे, ग्रामविकास अधिकारी धाबुगडे, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

सुपनेत पहिलाचा रुग्ण सापडल्याने साऱ्या गावाची चिंता वाढली आहे. हा फैलाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाययोजना राबवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्याचबरोबर सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी सर्व्हे करण्याची मोहीम आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सुरू केली आहे. प्रशासनानेही तेथे आवश्‍यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दरम्यान, मंत्री देसाई यांनी संबंधित सील केलेल्या ठिकाणच्या ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचना केली. 

ते म्हणाले, ग्रामस्थांनी घाबरून जायचे कारण नाही. प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत दक्षता घेत आहे. संबंधितांच्या सहवासातील लोकांनी स्वतःहून तपासण्यासाठी पुढे आल्यास पुढील धोका टळतो. त्यामुळे कोणीही भीतीपोटी घरात बसू नये. सर्व्हेसाठी आलेल्या आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांनी खरी ती माहिती द्यावी. त्यामुळे एखादा गरजू रुग्ण पुढे उपचारार्थ पाठवण्यासाठी चांगली मदत होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT