karad 
सातारा

अतिपावसाने शेतातच मूग, घेवड्याला आले कोंब

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः उंडाळे व येळगाव परिसरात पावसामुळे खरीप हंगामातील मूग, घेवडा या कडधान्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. 

यावर्षी जूनचा सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरण्या, टोकणी लवकर केली. त्यानंतर 15 दिवस पाऊस सुरू राहिला. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकाचा आंतरमशागती पूर्ण केल्या. ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगामातील सर्वच पिके जोमात आली; पण सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले. आडसाली लागणीच्या भुड्यावर भुईमूग, घेवडा, टोकणी केली. पेरणी केलेल्या शेतात अती पावसामुळे पाणी साचल्यामुळे घेवडा कुजून गेला. काही ठिकाणी कडधान्याला मोड आल्याची स्थिती आहे. 

सध्या शेतकरी शेतामध्ये कुजलेली कडधान्याची पिके शेतातून बाहेर काढून टाकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. दुसरीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे परिसरातील धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. भरपूर पावसामुळे येळगाव परिसरातील येणपे, येवती, भुरभूशी, गोटेवाडीतील भाताची पीक चांगले आहे. मात्र, कडधान्याच्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : मोटार वाहन विभागावर ‘लक्ष्मीची कृपा’; महापालिकेकडून नवीन वाहने, यंत्रांच्या खरेदीवर ५८ कोटींचा निधी मंजूर

अग्रलेख : आभासी आनंद, खऱ्या वेदना!

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT