Satara Latest Marathi News 
सातारा

पहिल्याच प्रयत्नात CA परीक्षेत नेहा, प्रतीक्षाची दमदार कामगिरी; राज्यात उंचावले साताऱ्याचे नाव

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : सीए परीक्षेत नेत्रदीपक यश पटकाविणाऱ्या नेहा चौधरी, प्रतीक्षा ढाणे यांचा विक्रांतनगर येथील शिक्षकांतर्फे सत्कार करण्यात आला. नेहा चौधरी अन्‌ प्रतीक्षा ढाणे या दोघीही विक्रांतनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनी. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षेत प्रावीण्य संपादन केले. 

"इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया'ने सीए (नव्या अभ्यासक्रम) अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. त्यात दोन्ही ग्रुपचे विषय एकत्र घेऊन पहिल्याच प्रयत्नात या दोघीही उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी उपाध्यक्ष अनिल जायकर, संचालक दत्तात्रय कोरडे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या दोघींच्या प्राथमिक शाळेतील वर्गशिक्षिका निर्मला जगदाळे अन्‌ मीना साळुंखे यांचाही सत्कार झाला. प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण, धावपटू अलमास मुलाणी यांच्या हस्ते तो करण्यात आला. 

नेहा चौधरी हिने हिने यशामागील प्रयत्न मांडले. सुनीता देवकर यांनी प्रास्ताविक केले. सुनील खंडाईत यांनी स्वागत केले. प्रवीण घाडगे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. अनिल चौधरी, मारुती ढाणे, भीमराव यादव, सुभाष जाधव, भरत सावंत, भरत चव्हाण, सुहास गोरे, राजेंद्र लोखंडे, बाळकृष्ण जगताप, नितीन राजे, रामचंद्र लवळे, कुलदीप मोरे, राजेंद्र देशमाने, प्रमोद बावकर, चंद्रकांत चव्हाण, शांताराम वाघ, किशोर मतकर, बाळकृष्ण पवार, वैभव डांगे, वैशाली मतकर, संगीता ढेंबरे, डॉ. सुनीता चौधरी, राणी ढाणे, अबोली यादव, अर्चना यादव उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT