Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

देवा शप्पथ! आई, मी कधीच तंबाखू खाणार नाही; साताऱ्यात विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा संकल्प

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : आई... बाबा..., मी कधीच तंबाखू खाणार नाही आणि सिगारेटही ओढणार नाही. अगदी देवा शप्पथ, असे पत्र लिहित येथील रा. ब. काळे शाळेच्या 300 मुलांनी नुकताच व्यसनमुक्तीचा संकल्प केला. मुलांबरोबर शाळेचेही या उपक्रमामुळे कौतुक होत आहे. 

पहिली ते सातवीचे वर्ग असलेली धनणीच्या बागेतील रा. ब. काळे शाळा ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व्हावेत, त्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळावी यासाठी पुस्तकी शिक्षणाबरोबरच येथे विविध कार्यक्रमांतून जीवन शिक्षणही दिले जाते. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. नुकताच सर्वत्र जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला. या शाळेतही हा दिन ऑनलाइन साजरा केला गेला. शालेय विद्यार्थ्यांमध्येही व्यसनांचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर असते. शालेय वयातच त्यांना तंबाखू, गुटख्याचे व्यसन लागत आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांना कर्करोगासारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागू शकते, हे ओळखून जागतिक कर्करोगदिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी त्यानिमित्त शालेय तासाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. 

काय बाई सांगू, कसं गं सांगू.. मलाच माझी वाटे लाज!

पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे याबाबत ऑनलाइन उद्‌बोधन केले. या ऑनलाइन उपक्रमात विद्यार्थ्यांसह पालक तसेच शाहू बोर्डिंगमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलेही सामील झाली होती. पालकांनीही मुलांसमोर व्यसनमुक्त राहून चांगला आदर्श घालून द्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी कायम व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला. आपला संकल्प कागदावर लिहून हे पत्र मुलांनी आपल्या आई-बाबांना सुपूर्द केले. या उपक्रमात उपशिक्षिका पद्मावती शिंदे, माधुरी भोईटे, आशा वाघमोडे, वर्षा भोसले, ज्योती ढमाळ, विजय माने आदी शिक्षक, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara ST demand: मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवावी, हरीभाऊ राठोडांचा इशारा! ST मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Latest Marathi News Updates : ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, तारीखही समोर आली!

Vice President Oath 2025 : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले सीपी राधाकृष्णन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Solapur Rain Update:'सोलापूरला पाण्याचा वेढा; १५० नगरांमध्ये पाणीच पाणी', घरांना नाल्याचे स्वरूप; आयुक्त, आमदारांकडून पाहणी

PM Kisan Yojana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार; नाव यादीत आहे का, कसं तपासाल?

SCROLL FOR NEXT