Satara Latest Marathi News 
सातारा

MPSC EXAM 2021 : राज्य सरकार आमच्या आयुष्याशी खेळतंय; विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रीयेवर पालकमंत्र्यांचे 'हे' विधान

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या तीन ते चार वर्षांपासून आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय. मात्र, एक वर्ष कोरोनाच्या काळात गेल्याने नुकसान झाले आहे. आई-वडील कष्ट करुन पैसे देत असताना वारंवार परीक्षा पुढे ढकलणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची परीक्षा झालेली नाही. वय वाढत असल्याने परीक्षेपासून वंचित रहावे लागण्याचा धोकाही आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करुन आयोगाने ठरल्याप्रमाणे 14 मार्चला परीक्षा घ्यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली. 

मागील वर्षभरात कोरोनाचे संकट व मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे तब्बल चार वेळा राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विविध जिल्ह्यांनी निर्बंध लावल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. आता परीक्षा पुढे ढकलण्यासाठी कोरोनाचे कारण दिले आहे. मात्र, या आधी रेल्वेतील पदभरतीच्या परिक्षा झाल्या असून टपाल खाते व दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असताना एमपीएससी परीक्षा घेण्यात अडथळे आणले जात आहेत, अशी प्रतिक्रीया सुमित राऊत याने व्यक्त केली. 

MPSC Exam: विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका - प्रविण दरेकर

गेल्या तीन वर्षांपासून पुण्यात अभ्यास करत होतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गावी आलो आहे. ऑक्‍टोबरपासून साताऱ्यात अभ्यास करताना राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आमची उमेदीची वर्ष वाया जात आहेत. आयोगाने निर्णयाचा फेरविचार करुन परीक्षा घ्यावी, असे आवाहन तुषार माळी याने केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या स्थितीशी सामना करत आयुष्यातील महत्वाची वर्ष अभ्यासात घालवून अधिकारी होण्याची स्वप्न बघत आहोत. मात्र, राज्य लोकसेवा आयोग व राज्य सरकार आमच्या आयुष्याशी खेळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया सतीश जगदाळे या युवकाने दिली. 

परीक्षा होणे गरजेचे : पालकमंत्री 

गेल्या वर्षभरात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. साधारण 2019 मधील ही परीक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भावर काही जिल्ह्यांत वाढत आहे. तरीही इतर शाळा व वर्ग सुरू आहेत. अनेक दिवस विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे ही परीक्षा होणे गरजेचे आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वयाचाही विचार भविष्यात केला जाईल, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील सांगितले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT