Satara 
सातारा

दर कमी झाले तरी आले क्षेत्रात वाढ, तज्ज्ञांचे मत

विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. भर उन्हात लागवड सुरू असून, सरासरीपेक्षा जास्त म्हणजेत अडीच हजार हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. लॉकडाउनमुळे आले पिकाचे दर निम्म्यावर आले असलेतरी लागवडीच्या क्षेत्रात घट होणार नसल्याचे तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे. 

सातारा जिल्ह्यात ऊस, हळद या नगदी पिकांच्या बरोबरीने आले लागवड होत असते. जिल्ह्यात अडीच हजार हेक्‍टर सर्वसाधरण क्षेत्र आहे. बियाणे खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, खटाव तालुक्‍यांत सर्वाधिक आले पीक घेतले जाते. अक्षयतृतीया हा आले लागवडीचा मुहूर्त मानला जात असल्यामुळे या मुहूर्तावर लागवड करण्याची प्रथा आहे. मात्र, या काळात उष्णतेत वाढ जास्त असल्याने आले खराब होण्याची आले लागवड शेतकऱ्यांनी टाळली आहे. मोसमी पाऊस झालेल्या ठिकाणी व पाण्याची उपलब्धतता असलेल्या ठिकाणी आले लागवडीस प्रारंभ झाला आहे.

कमी अधिक प्रमाणावर लागवड सुरू आहे. मात्र, सध्या 38 सेल्सिअसच्या वर तापमान असल्याने काही शेतकऱ्यांकडून पाणी देऊन लागवड केली जात आहे. 22 ते 23 हजार प्रतिगाडी (500 किलो) प्रमाणे आले बियाण्याचे दर राहिले आहे. सध्या मात्र कोरोनामुळे आले पिकाच्या दरात घसरण होऊन दर निम्म्यावर आले आहेत. कोरोना येण्यापूर्वी आल्याचे प्रतिगाडीस 22 ते 24 हजार रुपये दर होते. त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाल्याने मुंबई, पुणे यासह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद झाल्यामुळे आल्याची खरेदी- विक्रीवर मर्यादा आल्या. याचा परिणाम आल्याच्या दरावर झाला असून, सध्या 12 ते 13 प्रतिगाडी म्हणजेच निम्म्यावर दर आले आहेत. 

चौकट... 

नेहमी इतके दर राहतील 

आल्याचे नेहमी इतके दर राहतील या अंदाजावर बियाणे खरेदी करून आडी लावण्यात आली आहेत. यामुळे आले पिकांच्या क्षेत्रावर परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samosa Health Risk : एका समोशासाठी द्यावे लागतील ३ लाख रुपये; डॉक्टरांनी सांगितले थेट हृदयाशी कनेक्शन

‘बाबो... जान्हवी परतली तनुजा बनून!’ लक्ष्मी निवास मालिकेतला खतरनाक ट्वीस्ट, जान्हवीचा स्मृतीभ्रश होणार?

Latest Marathi News Live Update : पावसाचा हाहाकार! शिरपूर तालुक्यात मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान

Work From Home Scam : ‘झुकती है दुनिया.. झुकानेवाला चाहिये’ म्हणत, ‘वर्क फ्रॉम होम’ दिलं अन् कोट्यवधींची केली फसवणूक, अगरबत्ती पॅकिंग घोटाळा

Saree Style Tips : साडी म्हणजे संस्कृती! सोनाली पाटीलने सांगितले, साडी का आहे तिचा 'सर्वांत कंफर्टेबल वेअर'?

SCROLL FOR NEXT