patan 
सातारा

यांत्रिक युगातही "चल रं सर्जा'ची हाळी!

सकाळ वृत्तसेवा

मल्हारपेठ (जि. सातारा) ः मल्हारपेठ व दिवशी परिसरात पिकांच्या आंतरमशागतीची कामे हातघाईवर आहेत. खुरपणी, भांगलणीसह पारंपरिक बैलकोळपणीची कामेही जोमात सुरू असून पेरणीनंतर पावसाच्या विश्रांतीमुळे कोळपणीच्या कामाला वेग आला आहे. पिके समाधानकारक असून भात लागणीसाठीही शेत तयारीच्या कामाला सुरवात झाली आहे. भाताचे तरवेही समाधानकारक असल्याने बळिराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. 

गतवर्षीपेक्षा यावर्षी जादा उत्पन्न मिळेल, या आशेने बळिराजाने आंतरमशागतीची कामे पूर्ण केली. बहुतांश डोंगराळ भागात जंगली श्‍वापदांकडून पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने अनेकांनी शेती करण्याचे सोडून दिले होते. मात्र, तब्बल तीन महिन्यांत कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमध्ये गावी परतलेल्या चाकरमान्यांनी पुन्हा पडीक शेतीची मशागत करून पेरणी केली असून शेतात पिकांची उगवण चांगल्या प्रकारे दिसत आहे. 

सध्या ग्रामीण भागात बैलाच्या साह्याने शेतीची मशागत करण्याची पद्धत जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सगळीकडे यांत्रिक पद्धतीचा वापर होत असल्याने बैल सांभाळणे अवघड झालं आहे. मात्र, तरीही पाटण तालुक्‍याच्या चाफळ, उरुल, दिवशी, कोयना, मोरगिरी भागात आजही बैलजोडीच्या साह्याने कुळवट, नांगरट, पेरणी, चिखलणी, कोळपणी आणि भाताच्या सुगीत भात मळणीच्या कामास बैलजोडीचा वापर केला जात आहे. भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड इत्यादी पिकांची कोळपणीची कामे सुरू आहेत. सध्या खुरपणी, कोळपणीच्या कामाने सर्वत्र चांगलाच वेग घेतला असल्याने पिकांची आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून बळिराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस सुरू होताच परिसरात भात लागणीची कामे जोर धरण्याची आशा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT