बाळासाहेब पाटील  
सातारा

सहकारी संस्थांच्या संचालकांना ‘महाविकास’चा सत्ता बोनस...

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कर्जमाफीच्या अंमलबजावणीत सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी गुंतलेले असल्याने 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे अडचणीचे झाले होते. हे ओळखून राज्य शासनाने मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या संचालकांना जानेवारीमध्ये तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या; पण मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात सुरू झाला. परिणामी संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन केल्याने सर्व काही ठप्प झाले. परिणामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला गेला. 
मात्र, अद्यापही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. सध्या कोरोना बाधितांची जिल्ह्यातील संख्या 773 झाली आहे. जूनपर्यंत सहकारी संस्थांच्या संचालकांना दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांच्या संचालकांना आणखी तीन महिने म्हणजेचे सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे कृष्णा कारखाना व जिल्हा बॅंकेची रणधुमाळी आता पुढील वर्षातच होणार आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेची मुदत पाच जुलैला संपणार होती. मात्र, मुदतवाढ जाहीर केल्याने गुरुजींच्या बॅंकेची निवडणूक ऑक्‍टोबरमध्येच होईल, अशी शक्‍यता आहे.  

ठराव बदलावे लागणार... 
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिल्याने सप्टेंबरमध्ये जिल्हा बॅंकेसह विकास सेवा सोसायट्यांचीही निवडणूक होईल. त्यामुळे सोसायट्यांचे संचालक बदलल्यास तेथून जिल्हा बॅंकेसाठी झालेले ठराव पुन्हा करावे लागण्याची शक्‍यता आहे. मागील वेळी केलेले ठराव बदलावे लागल्यास काही संचालकांची अडचण होऊ शकते. 

""कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका 18 मार्चच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या होत्या; पण अद्यापही साथीचा रोग आटोक्‍यात येण्यास काही अवधी लागणार आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य होणार नाही. त्यासाठी सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश केले आहेत, अशा सहकारी संस्था वगळून उर्वरित राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.'' 
- बाळासाहेब पाटील, सहकार व पणन तथा पालकमंत्री. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT