Satara Latest Marathi News Satara Farmer Protest News
Satara Latest Marathi News Satara Farmer Protest News 
सातारा

आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे ताबडतोब मागे घ्या; साताऱ्याच्या खासदारांची मोदी सरकारकडे मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 'किसानों पर झुठें मामले वापस लो' ( ते गुन्हे मागे घ्या), अशा आशयाचा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून अन्य खासदारांसोबत उभे राहत केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न खासदार श्रीनिवास पाटील (MP Srinivas Patil) यांनी गुरूवारी लोकसभेत केला.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीसुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या, असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.

दिल्लीच्या सीमांवर मागील 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यात काही शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. या भागात पावसाने हजेरी लावली असून थंडी देखील वाढली आहे. थंड वारे व पाऊस यांमुळे शेतकऱ्यांना जीवघेणा त्रास होऊ नये, यासाठी सरकारने यातून लवकरात-लवकर मार्ग काढावा, अशी आमची मागणी असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. आंदोलनकर्ते शेतकरी कोणाचे ना कोणाचे तरी भाऊ, पती, पुत्र आहेत. या आंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्याच बांधवांसोबत हा असा दुजाभाव न दाखवता सरकारने यावर लवकर तोडगा काढावा. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जन-आंदोलनाचे स्वरूप आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने लवकरात-लवकर यावर मार्ग काढावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT