MSEB Electricity  sakal
सातारा

सातारा : महावितरणला वैतागले शेतकरी; लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीव धोक्यात

विद्युत वितरण व्यवस्थेतील हा अस्ताव्यस्तपणा जीवघेणा

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक : वीज ट्रान्स्‍फॉर्मरच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष, लोंबकळत पडलेल्या तारा व उघड्या विद्युत पेट्यांसह अनेक समस्यांचे गुंते येथील शिवारात उभे आहेत. विद्युत वितरण व्यवस्थेतील हा अस्ताव्यस्तपणा जीवघेणा आहे. महावितरणचे दुर्लक्ष व कर्मचाऱ्यांच्या विस्कळित कामकाजाला शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत.

रेठरे बुद्रुकच्या शिवाराचा परीघ चौहोबाजूस सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्या प्रमाणात शेतीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. नदी, बोअरवेल व विहिरींच्या आधारावर शेतीस पाण्याची व्यवस्था आहे. ऊस, सोयाबीन, भात व गहू पिकांतून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. असे असले, तरी सध्‍या गावास विद्युत वितरण कंपनीच्या विस्कळित कारभारामुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. गावच्या शिवारात अनेक ठिकाणच्या ट्रान्स्‍फॉर्मरची देखभाल रखडल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

तर अनेक ठिकाणी उघड्या विद्युत पेट्या व लोंबकळत असणाऱ्या तारा जीवितास धोकादायक आहेत. ही जीवघेणी परिस्थिती हाताळण्याऐवजी संबंधित शाखेतील यंत्रणेचा काम सोडून वेगळाच कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांनी समस्या मांडल्यानंतर त्या सोडवण्यासाठी दिरंगाई होत आहे. कर्मचारी ग्राहकांना नाहक त्रास देतात. त्यामुळे समस्या आणि अडचणींचा शेतकरी सामना करत आहेत.

‘‘जादा अश्वशक्तीचे ट्रान्स्‍फॉर्मर दुरुस्तीसाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव दाखल केले आहेत. विजेच्या पेट्या बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वेळोवेळी जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली जाते.’’

-प्रवीण पाटील, शाखा अभियंता, विद्युत कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT