टोळधाड
टोळधाड 
सातारा

शेतकऱ्यांनो, टोळधाड प्रतिबंधासाठी सज्ज राहा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : टोळ किडीच्‍या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच टोळधाड प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे. 

वाळवंटी टोळाच्या जीवनक्रमात अंडी, पिले अगर बाल्यावस्था व प्रौढ अशा प्रमुख तीन वाढीच्या अवस्था आहेत. वाळवंटी टोळांची पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेतील वनस्पतींचा फडशा उडवत पुढे सरकतात. अशी टोळधाड पिकांचे जास्तीत- जास्त नुकसान करते. शिवाय ही टोळधाड दुरवर उडून जात असल्याने पिकांना या किडीपासून मोठा धोका असतो.

वाळवंटी टोळ किडीची आर्थिक नुकसान पातळी ही 10,000 प्रौढ प्रती हेक्‍टरी किंवा पाच ते सहा पिल्ले प्रती झुडूप अशी आहे. यापैकी कोणतीही स्थिती उद्भवल्यास तातडीने किडींचे नियंत्रण करणे आवश्‍यक आहे. टोळधाड प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

टोळ रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून, तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते, तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक आझाडिरेक्‍टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

या किडीच्या नियंत्रणासाठी विष अमिषाचा वापरही प्रभावी ठरतो. टोळ किडीसाठी 20 किलो गहू किंवा भाताचे तूसामध्ये फिप्रोनील पाच एससी तीन मिली मिसळून त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. याकडे टोळ आकर्षित होतात आणि मरून जातात, असे त्यांनी सांगितले. 

अशी करा फवारणी 
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने सुचविल्याप्रमाणे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये क्‍लोरोपायरिफॉस 20 टक्के प्रवाही 24 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा फिप्रोनिल पाच एससी 2.5 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक मिसळून फवारणी करावी, असे श्री. राऊत यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT