satara
satara sakal
सातारा

सातारा : शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय

विशाल गुंजवटे

बिजवडी : दहिवडी वीज वितरण कंपनीच्या विस्कळित कारभारामुळे येळेवाडी (ता. माण) येथे गेल्या २० ते २५ दिवसांपासून ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला होता. याप्रश्‍नी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे धाव घेतली होती. त्यानंतर संघटनेच्या केशव जाधव यांनी शेतकऱ्यांसह थेट दहिवडी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. याची दखल घेत ‘वीज वितरण’ने तत्काळ ट्रान्स्फॉर्मर बसविल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.

वीजवितरण कंपनीच्या विस्कळित कारभारामुळे येळेवाडी हद्दीतील जगतापवस्तीनजीकच्या ट्रान्स्फॉर्मरवरील वीजपुरवठा अनेक दिवस खंडित झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान होत होते. याबाबत वीज वितरण कंपनीशी वारंवार संपर्क करूनही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपला प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

त्या वेळी शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष केशव जाधव, माण तालुका संघटक रामचंद्र बळीप, शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष शंकरराव जाधव, दहिवडी शहराध्यक्ष ज्योतिराम जाधव, पिंटू जगताप, येळेवाडी गावातील शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढत तत्काळ ट्रान्स्फॉर्मर बसवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वीजवितरण कंपनीने ट्रान्स्फॉर्मर बसविल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतकरी संघटनेचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT