Satara 
सातारा

वाठार स्टेशनमध्ये वाढली कोरोनाची धास्ती, प्रवेशबंदीमुळे वाहतुकीस अडथळा

साहेबराव होळ

गोडोली (जि. सातारा) : गेले पाच महिने कोरोनाला प्रतिबंध करूनही अखेर येथे कोरोनाने शिरकाव केल्याने वाठार स्टेशन, वाठारगाव, तळीये, देऊर, पिंपोडे बुद्रुक येथे धास्ती वाढलेली आहे. येथील मुख्य बाजारपेठेतील एकाच कुटुंबातील पाच जण बाधित झाल्याने परिसरातील गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाठार स्टेशन हे या भागातील मुख्य बाजारपेठ आणि दळणवळणाचे केंद्र असल्याने सध्या बाधित क्षेत्रात येण्या- जाण्यास बंदी घातलेली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. 

याबाबतीत अधिक तपशील असा, की वाठार स्टेशनमध्ये रेल्वेमार्गामुळे रहिवाशी वसाहतीचे दोन भाग झालेले आहेत. रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील भागात स्थानिक रहिवाशांसह पतसंस्था, मोटर गॅरेज, ज्युनियर ते सिनियर कॉलेज, व्यापारी बाजारपेठ, पोलिस ठाणे आदी अस्थापनांसह शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. वाग्देव चौकापासून सातारा आणि लोणंद, फलटण- बारामतीकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपासून रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील वसाहतीमधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी औषधोपचारासाठी डॉक्‍टरकडे धाव घेतली. त्या वेळी आजाराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. तातडीने वैद्यकीय विभागाने कोरोनाचा संसर्ग टाळला जावा म्हणून वरिष्ठांना ही बाब कळवली, लगेच तालुका स्तरावरून पोलिस खात्याला परिसर बंदिस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

वाठार पोलिसांनी लगेचच शरद पतसंस्थेच्या पूर्वेला संपूर्ण रस्ता बंद करून तेथे बंदोबस्त तैनात केला आहे. श्री वाग्देव चौकातून पश्‍चिमेला वळवून वाहतूक मुख्य बाजारपेठेमध्ये आणली आहे. त्यामुळे वाहतुकीची तात्पुरती सोय झाली आहे. मात्र, येथील बाजारपेठेत पिंपोडे बुद्रुक, तळीये, देऊर, तडवळे संमत वाघोली येथील अनेकांचा संपर्क येत असल्याने परिसरात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मुख्य बाजारपेठ ओस पडत चालली आहे. ज्यांना संसर्ग झालेला आहे. ते नेमके कोणाकोणाच्या संपर्कात आले होते याचा शोध घेणे सुरू झालेले आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: ''नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि पुढेही राहतील'' जेडीयूची पोस्ट, पण नंतर...

IND vs SA, 1st Test: पहिल्याच दिवशी २०० च्या आत द. आफ्रिका ऑलआऊट; जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स, तर सिराज, कुलदीपही चमकले

Bihar Election Result 2025 Live Updates : बेगुसरायमध्ये भाजपचा दणदणीत विजय, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोट : २,९०० किलो स्फोटके कुठून आली? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

Motorola Discount : मोटोरोलाचा ब्रँड 5G मोबाईल चक्क 3 हजारात; कुठं सुरुय ही 50% डिस्काउंट ऑफर? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT