सातारा

थरारक : प्रेयसीच्या वादातून पोलिस ठाण्यातच खून

सकाळ वृत्तसेवा

सातारा : प्रेयसीच्या वादातून आज (गुरूवारी) तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला कोयत्याने उभा चिरल्याची थरारक घटना घडली. हल्ला करण्यासाठी आलेल्याच्या कोयत्यानेच त्याने डोक्‍यात व हातावर गंभीर वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस ठाण्यामध्येच खून होण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना आहे. 

सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा. सैदापूर) असे मृताच नाव आहे. तर, रामा दुबळे (रा. मतकर कॉलनी) असे त्याला मारणाराचे नाव आहे. या मारामारीत रामा दुबळेही जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामा दुबळे याची सासुरवाडी सैदापूरमध्ये आहे. त्याच वस्तीत सुरेश कांबळे हा त्याच्या कुटुंबासह राहत होते. रामा दुबळे याची पहिली दोन लग्न झाली आहेत. आता त्याचे दुसऱ्या एका मुलीबरोबर फिरणे चालू होते. त्या मुलीचा सुरेश कांबळे याच्या मुलीशी वाद झाला होता. त्याबाबत त्या मुलीने रामाला माहिती दिली. त्यानंतर रामाने सुरेश कांबळेच्या मुलीला शिवीगाळ व मारहण केली. तीन दिवसापूर्वी याबाबत सुरेशच्या मुलीने तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. 

दाखल तक्रारीमध्ये आज दोघांनाही तालुका पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. सुरेश कांबळे हा आधीच तालुका पोलिस ठाण्यात आला होता. त्याने सोबत कोयता आणला असल्याची कोणाला माहिती नव्हती. थोड्या वेळाने रामा दुबळेही पोलिस ठाण्यात आला. तो पोलिस ठाण्यात आल्या-आल्याच सुरेश कांबळेने रामा दुबळेवर पोलिसांसमोरच कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. हल्ला करत-करत दोघे पोलिस ठाण्याच्या बाहेर पर्यंत आले. या वेळी सुरेश कांबळेच्या हातातून कोयता निसटून खाली पडला. तीच संधी साधत रामा दुबळेने तो कोयता उचलला आणि सुरेश कांबळेच्या डोक्‍यात, हातावर सपासप वार करायला सुरवात केली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात रक्ताचा सडाच पडला होता. 

सोडावायला मध्ये पडायलाही कोणी धजावणार नाही अशी परिस्थीती होती. त्यातूनही काहींनी पुढे सरसावून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. गंभिर हल्ला व रक्तस्त्रावामुळे सुरेश कांबळे खाली कोसळला. तसेच रामाच्या शरिरातूनही रक्त वहात होते. पोलिसांनी दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, सुरेश कांबळेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रामा दुबळेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या या थरारक प्रकारामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधिक्षक धिरज पाटील यांनी तातडी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाबाबतच सुचनाही दिल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया तालुका पाेलिस ठाण्यात सुरू हाेती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

SCROLL FOR NEXT