patan 
सातारा

बापरे! विंगच्या शिवारात लोंबकळताहेत प्रवाहित वाहिन्या

विलास खबाले

विंग (जि. सातारा) ः शिवारात लोंबकळणाऱ्या प्रवाहित वीज वाहिन्यांचा प्रश्न विंगसह परिसरात ऐरणीवर आला आहे. प्रवाहित वाहिन्यांचा शिवारातील उसाला स्पर्श होऊन त्यांचे शेंडे करपले आहेत. त्यामुळे दुर्घटनेची टांगती तलवार शिवार आणि शेतकऱ्यांवर आहे. या धोकादायक स्थितीबाबत वीज कंपनीला जाग कधी येणार, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांतून उमटत आहे. 

विंगसह परिसरात शेतीपंपांना व घरगुती वीज पुरवठ्यासाठी वीज कंपनीने मोठे जाळे उभारले आहे. हजारच्या जवळपास शेतीपंपांची कनेक्‍शन, तर तीन हजारांवर घरगुती वीज कनेक्‍शन आहेत. शेतातील बांधावरून वीज खांबासह प्रवाहित वीज वाहिन्या ठिकठिकाणी नेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिवारात त्यांचे जाळेच तयार झाले आहे. सध्या ठिकठिकाणी मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खांब झुकले आहेत. वाहिन्यातील ताण कमी होऊन त्या लोंबकळत आहेत. येथील सुतारकी वस्ती परिसरात दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. येथील बाळासाहेब माने यांच्या शेतात तर वाहिन्या लोंबकळत आहेत. त्यांचा उसाला स्पर्श होऊन घर्षणाने ऊस करपला आहे. 

चचेगाव परिसरातील शेतीपंपांना करण्यात आलेला वीजपुरवठाही तेथूनच गेल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी भीतीपोटी आम्ही तिकडे जात नाही आणि खबरदारी म्हणून कुणाला जावूही देत नाही, असे शेतकरी श्री. माने यांनी सांगितले. त्याबाबत वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, त्यावर त्यांनी अद्यापही कार्यवाही केलेली नाही. परिणामी चार महिन्यांपासून अशीच स्थिती तेथे आहे. 

दुर्घटना होण्याआधीच जागे व्हा... 
विंगसह परिसरातील अनेक शिवारातील प्रवाहित वीजवाहिन्या अनेक ठिकाणी पिकांपर्यंत खाली आल्या आहेत. काही ठिकाणी त्या उसाला टेकल्या आहेत तर काही ठिकाणी झाडांनाही स्पर्श करत आहे. ऊस आणि झाडे ही ओली असल्याने त्यातून लगेच प्रवाह उतरतो. त्यामुळे जोराचा वारा आल्यावर तेथे स्पार्किंगच्याही घटना घडतात. त्यामुळे वीज कंपनीने दुर्घटनेआधी तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT