सातारा

वनविभागाची माेठी कारवाई; साताऱ्यात 12 शिकारी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : निनाम पाडळी (ता.सातारा) या गावानजीकच्या डोंगरात शिकार करण्यासाठी गेलेल्या 12 शिकाऱ्यांना सातारा वनविभागाने ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकारी शितल राठोड यांनी दिली.

राठोड म्हणाल्या 16 जूनला आम्हांला शिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही वनपाल परळी यांच्या समवेत सापळा रचला. ही कारवाई करण्यासाठी दोन पथक तयार करण्यात आले. या सापळ्यात 12 लोकांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा वाघीर, दोन दुचाकी, एक तीन चाकी वाहन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संशियतांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यानूसार हे फार मोठ्या प्रमाणात शिकार करीत असणार. एका मोठ्या रॅकेटचीही शक्‍यता राठोड यांनी व्यक्त केली. दरम्यान सद्यस्थितीत कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी संशयितांना न्यायालयात नेण्यात आले आहे.

दरम्यान लाॅकाडाउनच्या काळात देखील वनविभागाने सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून प्राण्यांची शिकार राेखण्याचे प्रयत्न केले. लाॅकडाउन शिथील झाल्यानंतर आत्ता पर्यंत करण्यात आलेली ही पहिलीच माेठी कारवाई झाली आहे.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

शाब्बास...खटाव, इंजबाव ग्रामपंचायतींना आठ लाखांचे पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Marathi News Live Updates : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाने हजारो माशांचा मृत्यू; भाविक, ग्रामस्थ आणि शेतीच्या आरोग्यावर गंभीर संकट

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT