jawali 
सातारा

"पाचगणी वन फॅमिली' नव्हे गरजूंचा मित्र!

सकाळ वृत्तसेवा

पाचगणी (जि. सातारा) : पाचगणी रोटरी क्‍लबने सलग तिसऱ्यावेळी "पाचगणी वन फॅमिली' या योजनेंतर्गत 720 गरजूंना जीवनाशयक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या कालावधीत गरजूंना सहकार्य देण्यासाठी पाचगणी रोटरी क्‍लबने सामाजिक बांधिलकी जोपासली असून अधिकाधिक गरजूंना सहकार्य करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे "रोटरी'चे अध्यक्ष शाहाराम जवानमर्दी यांनी सांगितले. 

पाचगणीच्या रोटरी क्‍लबच्या वतीने तसेच मुंबई येथील गोदरेज कंपनीअंतर्गत रोटरी क्‍लब ऑफ क्वीन्स नेकलेस तसेच वेजमेंन इम्पेक्‍स, जायंट क्‍लब आयलंड सिटी, लायन्स क्‍लब (पूर्व मुंबई) व रुबाबाई अमिजी संस्था आदींच्या सहकार्याने वस्तू वाटपांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात शहर व आजूबाजूच्या गावांतील गरजू लोकांसाठी अन्नधान्य व गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या हस्ते किट वाटपाची सुरवात करण्यात आली. 

पाचगणी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष व सदस्यांच्या विशेष टीम वर्कने व्यवस्थित व सर्व नियमांचे पालन करत सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रात वाटप केले. यापूर्वी रोटरी क्‍लबने अन्नधान्य वाटपाबरोबरच नगरपालिका व पोलिस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप, वन खात्यातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटयझर तसेच येथील आरोग्य केंद्रातील कोरोना फायटर्सना आरोग्य किट वाटप केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT