सातारा

गोंदवले : उघड दार देवा आता...छाेट्या विक्रेत्यांची आर्त हाक

फिरोज तांबोळी

गोंदवले,(जि.सातारा) : दुकाने उघडायला परवानगी मिळाली खरी, पण मंदिर बंद असल्यामुळे ग्राहकच नाहीत. त्यामुळे उघड दार देवा आता अशीच भावना मंदिर परिसरातील दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. गोंदवल्यातील समाधी मंदिर परिसरातील दुकाने अद्यापही बंदच असल्याने व्यापारी अडचणीत आले आहेत.
 
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात पहिल्यांदा लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतरही कोरोनाबधितांची संख्या वाढतच राहिल्याने सलग अडीच महिने हा लॉकडाउन सुरूच राहिला. याकाळात जनजीवन विस्कळित झालेच; शिवाय व्यापारपेठा ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडले. धार्मिक स्थळे बंद झाल्याने त्या परिसरातील दुकानेही बंदच राहिली.
 
गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरही अडीच महिन्यांपासून बंदच आहे. परिणामी मंदिर परिसरातील प्रासादिक, खेळणी, फोटोफ्रेम, स्टेशनरी अशी मिळून सुमारे दीडशे दुकाने बंदच आहेत. प्रशासनाने काही अटी घालून बाजारपेठा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर इतर दुकाने सुरू झाली. परंतु, गोंदवल्यातील मंदिर परिसरातील दुकाने मात्र अद्यापही बंदच आहेत.
 
समाधी मंदिर अद्याप बंद आहे. याशिवाय दळणवळण देखील सुरू झालेले नाही. त्यामुळे समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मर्यादा पडल्या आहेत. विशेषतः पुणे, मुंबई, सांगली, नगर या भागातून येथे मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हे भाविक आपापल्या गावी अडकून पडले आहेत. समाधी मंदिरात नित्य उपासना सुरू आहे. परंतु, बाहेरून येणाऱ्या भाविकांना अद्याप प्रवेश नसल्याने हा परिसर सुना सुना पडला आहे. याचाच परिणाम मंदिर परिसरातील दुकानांवरही झाला आहे. समाधी दर्शनासाठी भाविक नसल्याने दुकानाला ग्राहक नसल्याचे चित्र आहे. 

लॉकडाउन शिथिल होऊन बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी समाधी मंदिर बंद असल्याने ग्राहक नाहीत. या संकटातून श्री महाराजांनीच आता मार्ग दाखवावा, अशा भावना व्यावसायिक राजेंद्र कट्टे यांनी व्यक्त केल्या.

CoronaUpdate : खराडे, शिंदेवाडी, शेणोली स्टेशन, डुईचीवाडी, कुसबुद्रुक, निढळ, कारंडवाडीतील आढळले बाधित

देशाला पूरक अर्थसंकल्पाची आवश्यकता : पृथ्वीराज चव्हाण
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT