तळबीड पोलिस ठाणे 
सातारा

गुड जॉब : गुटखा वाहतूकप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

वहागाव (जि. सातारा) : वैभव यशवंत कुचकर (वय 31, रा. शालिनीनगर, ढवळेश्वर कॉलनी, सांगली) असे कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे. 

पोलिसांची माहिती अशी ः वैभव कुचकर हा आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडील मालवाहतूक वाहनातून (एमएच 10 बीआर 4225) हा कोल्हापूर बाजूकडून साताऱ्याकडे निघाला होता. दरम्यान तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी नीलेश विभूते व सहकारी तासवडे टोलनाक्‍यावर वाहनांची तपासणी करीत असताना चालक वैभव कुचकर याने वाहन थांबवले नाही.

श्री. विभूते यांना त्या वाहनाबाबत संशय आल्याने त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करून ते वराडे गावच्या हद्दीत पकडले. त्यानंतर त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी नेण्यात येणारा गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित वाहन तळबीड पोलिस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनास याबाबतची माहिती देण्यात आली. संशयित वैभव कुचकर यास पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता गायकवाड यांनी याबाबतची तक्रार तळबीड पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी पकडलेला मुद्देमाल पंचनाम्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT