khatav 
सातारा

ग्रामपंचायती 88; प्रशासक 8 ः कसा होणार ग्रामपंचायतींचा कारभार

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने या ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एका विस्तार अधिकाऱ्याकडे तब्बल दहा ग्रामपंचायतींची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे स्वत:च्या खात्याचे कामकाज सुरळीत ठेवण्याबरोबरच अतिरिक्त कार्यभार संभाळण्याचे मोठे आव्हान या प्रशासकांपुढे उभे आहे. 

महामारीच्या प्रादुर्भावामुळे सध्या तरी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बॅंक, विकास सेवा सोसायटी, पतसंस्थांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नसल्याने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतींवर न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्याची जबाबदारी प्रशासकांकडे देण्यात आली आहे. प्रशासक नियुक्तीला कोणाचा आक्षेप देखील नाही; परंतु एका प्रशासकाकडे किती ग्रामपंचायतीचा कारभार असावा याला मर्यादा आहेत. खटाव तालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समितीकडे फक्त आठ विस्तार अधिकारी आहेत. त्यामुळे या आठ जणांकडे सध्या ग्रामपंचायतींचे कामकाज चालवण्याची जबाबदारी आहे. 

नोकरभरती थांबवल्यामुळे अनेक विभागांत जागा रिक्त आहेत. पुरेसे संख्याबळ नसताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा भार देत पंचायत समितीचे कामकाज सुरू आहे. त्यात काही अधिकाऱ्यांचे वय पन्नाशीच्या वर आहे. त्यातच आता गावचा कारभार चालवायची नवीन जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे. ग्रामसेवक गावात जात असले, तरी आता गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासक नियमितपणे त्या गावात जाणार का? ग्रामसेवकांना हाताशी धरून तालुक्‍याला बसून गावचा कारभार चालवणार याचे कोडे ग्रामस्थांना पडले आहे. पंचायत समितीतील काही विस्तार अधिकारी पदे रिक्त असल्याने दोन विस्तार अधिकाऱ्यांकडे संपूर्ण तालुक्‍याची जबाबदारी आहे. शिक्षण विभागाची जबाबदारी संभाळून दहा ग्रामपंचायतीचा कारभारही चालवण्याची कसरत आता दोन विस्तार अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. 

पालकमंत्र्यांना भेटून अडचणी मांडणार ः घार्गे 
विस्तार अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीच्या कामाची जबाबदारी दिली असली, तरी प्रत्येक प्रशासकाकडे दहा ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. प्रशासन गतिमान करताना प्रशासकांना अडचणी निर्माण होतील. याकरिता शासनाने इतर विभागातील कर्मचारी मदतीला घेऊन त्यांच्याकडे काही गावांची जबाबदारी द्यावी, यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून एका प्रशासकाकडे दोनच गावे देण्यात यावीत, अशी मागणी करणार असल्याचे सभापती रेखा घार्गे यांनी सांगितले. 

संपादन ः संजय साळुंखे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT