satara highway
satara highway Sakal
सातारा

Satara News : कऱ्हाडला महामार्गावर अवजड वाहतूक बंद !

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : पुणे- बंगळूर महामार्गावर येथे उड्डाण पुलाच्या कामाचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्याचा दहावी, बारावी परीक्षार्थ्यांना बसणारा फटका लक्षात घेऊन परीक्षा कालावधीत महामार्गावर सकाळी आठ ते दहा या गोल्डन हावर्समध्ये अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय झाला आहे.

अशी माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्याचबरोबर त्याची प्रयोगिक चाचणीही आज घेण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गही निघेल, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

या वेळी मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीबरोबर येथील उड्डाणपुलाच्या डिझाईन दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

आम्ही सुचवलेले डिझाईन त्यांनी मान्य केले आहे. त्यानुसार देशातील महत्त्वाच्या पुलामध्ये या पुलाचा समावेश आहे. एका पिलरवर सहा लेन व खाली आठ लेन असणार आहेत. कऱ्हाड व मलकापूरमधून जाणारा मार्ग १४ लेनचा असणार आहे. त्याचे काम दोन वर्षे सुरू राहणार आहे. संगम हॉटेल, ढेबेवाडी फाटा येथील पूल पाडण्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

त्याचा परिणाम दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी- पालकांवर होत आहे. त्यामुळे परीक्षा कालावधीत व काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी मार्गासंदर्भात प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभाग, कऱ्हाड, मलकापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. परीक्षा कालावधीमध्ये सकाळ आठ ते दहा गोल्डन हॉवर्समध्ये महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.’’

शहरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्यांसाठी बैलबाजार, मलकापूर, नांदलापूर या पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. संगम हॉटेलसमोरील पूल पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येथील मलबा दोन दिवसांत काढण्यात येणार आहे. यानंतर येथून सातारा, पुण्याकडे जाण्यासाठी शहरातून बाहेर पडणारी अवजड वाहतूक वळविण्यात येईल.

ढेबेवाड फाटा येथे दोन लेन वाहतुकीसाठी ठेवण्यात येणार आहे. येथे होणाऱ्या पार्किंगचा अडथळा होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. कोयना नदीवरील जुना पूल मजबूत करण्यात आल्यामुळे याचा शहरातून बाहेर पडणाऱ्या हलक्या वाहनांना चांगला उपयोग होत आहे.

या मार्गावर वारुंजी फाटा येथे स्ट्रीट लाइट, रिफलेक्टरसह सूचनांचे फलकही लावण्यात येणार आहेत. याचबरोबर महामार्गावर संगम हॉटेल समोर व ढेबेवाडी फाटा येथे कंट्रोल रूम उभारण्यात येणार असून, याद्वारे वाहतूक नियंत्रणात केली जाणार आहे.

तसेच महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे कर्मचारी, होमगार्ड, पोलिसही तैनात करण्यात आले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण, समस्या असल्यास नागरिकांनी थेट मला फोन करून माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT