सातारा : कोरोना विषाणूचा आपण सर्वजण प्राणपणाने मुकाबला करीत आहोत.तथापि, आता अनेक व्यवहार, अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपण काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी स्पष्ट केले आहे.
संकट पूर्णपणे टळले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. अजूनही रुग्णांची संख्या कमी होणे गरजेचे आहे. वैयक्तिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आता विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. भागवत म्हणाले,"" सर्व व्यवहार बऱ्यापैकी सुरू झाल्यामुळे सगळेजण एकत्र येणे, एकमेकांना भेटणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच घटकांनी सामाजिक अंतर राखून आपली जबाबदारी ओळखून राष्ट्रीय कर्तव्य समजून काळजी घेतली पाहिजे. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय सुरू झाली आहेत. विशिष्ट अटी घालून सरकारने मान्यता दिली आहे. याचा विचार करता आता प्रशासनाला बळ देण्यासाठी नागरिकांनी स्वतः दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासन आपले काम आणि खबरदारी पहिल्याप्रमाणेच घेत आहे.परंतु, नागरिकांची साथ मिळाली, तर आपण लवकरात लवकर यश मिळवू. यात कोणतीही शंका नाही. विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर वेळोवेळी शासन महत्त्वाचे निर्णय घेत आहे. अशा सूचनांचे पालन केले तर किती वैयक्तिक आणि सामाजिक फायदा होतो, हे सर्व नागरिक, कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. वेळोवेळीच्या परिस्थितीनुसार शासन-प्रशासन संकटावर मात करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे नियम निर्गमित करीत आहे. त्याचे पालन करणे गरजेचे आहे.''
नियम अखेर सर्वांच्याच आणि एकंदरीत समाजाच्या दृष्टीने अत्यंत हितकारक असतात. अलीकडेच एका महत्त्वाच्या आदेशानुसार शासनाने कर्मचारी, अधिकारी तसेच; कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सर्वांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात आल्यावर काय खबरदारी घ्यावी, तसेच; नागरिकांनी कार्यालयात आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत शासनाने नियम पाठविले आहेत. त्यानुसार कर्मचारी तसेच;नागरिकांनी कार्यालयात येताना थर्मल स्कॅनरवर तापमान पहावे आणि खात्री करावी. कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. कार्यालयातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. वारंवार ज्यांना स्पर्श केला जातो, अशा वस्तू तसेच पृष्ठभाग यांची स्वच्छता व्यवस्थित ठेवावी. कार्यालयात माहितीसाठी माहितीपत्रक लावावे. कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे वैयक्तिक स्वच्छता सांभाळावी. दर दोन तासांनी, तसेच; स्वच्छतागृह वापरल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुवावेत. कर्मचाऱ्यांनी एकत्र थांबू नये. तीन फूट अंतर पाळावे. दर दोन तासांनी हात धुवावेत. कार्यालयातील वस्तू निर्जंतुक कराव्यात. दिवसातून दाेन वेळा सर्व वस्तू स्वच्छ कराव्यात. हवा खेळती राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. कार्यालयात कमीतकमी लोक कसे भेट देतील, याची काळजी घ्यावी. एकत्र बैठका घेणे टाळून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे. वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि नियम काटेकोरपणे पाळल्यास या संकटावर मात करता येणे सहज शक्य आहे. सामूहिक प्रयत्न हाच अशा संकटावरील मात करण्याचा प्रभावी उपाय असतो. कोणी एक व्यक्ती किंवा केवळ शासन किंवा केवळ प्रशासन अशावेळी संपूर्णपणे यश मिळवू शकत नाही. सामाजिक आधार गरजेचा असतो. सर्वांनी एकत्र मिळून नियम पाळले आणि संयम ठेवला तर आपण या संकटावर मात करणार आहोत हे निश्चित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
लढा कोरोनाशी : लाखाे लाेकांसाठी सातारा जिल्हा परिषदेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी
विद्यार्थी, पालकहाे वह्या, पुस्तक घेण्यापुर्वी हे वाचा
जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने राबविला होम स्कुलिंग चा प्रयोग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.