सातारा : सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. माने sakal
सातारा

सातारा : सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. माने

मायणीकराचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन; स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून यादी जाहीर

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा

सातारा (मायणी) : विविध प्रकारचे संशोधन करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञांचे आंतरराष्ट्रीय मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांची यादी अमेरिकेतील विश्वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाने केली आहे. त्या यादीत मायणीचे सुपुत्र डॉ. राजाराम माने यांचा समावेश आहे. डॉ. माने हे सध्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात (नांदेड) भौतिकी विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

सामान्य शेतकरी कुटुंबातून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत डॉ. माने यांनी संशोधन क्षेत्रात गरूड भरारी घेतली आहे. दक्षिण कोरियातील हनयांग विश्वविद्यालयात त्यांच्या संशोधनास सुरुवात झाली. त्यांना कोरियाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि इंजिनिअरिंग फाउंडेशनकडून ब्रेन पूल फेलोशिप मिळाली. त्यांनी मुख्यत: नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन केले. त्याची दखल घेत कोरिया सरकारने त्यांना ‘फर्स्ट फॉरेन रिसर्च’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. हनयांग विद्यापीठातच त्यांनी निमंत्रित प्राध्यापक आणि कोरियाच्या राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेवर निमंत्रित शास्त्रज्ञ म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधन समितीवरही डॉ. माने यांनी काम केले आहे. नॅनो टेक्नॉलॉजीवरील सखोल संशोधनाच्या निमित्ताने त्यांनी अमेरिका, चीन, युरोप, इंग्लंड, जपान या देशांना भेटी दिल्या आहेत. भारत सरकारने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने, तर भारती विद्यापीठाने बेस्ट रिसर्च ॲण्ड पेटंटी पुरस्काराने सन्मानित केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ डीन ॲण्ड डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ रिसर्च, बोर्ड ऑफ नॅशनल ॲण्ड इंटरनॅशनल लिंकेज, बोर्ड ऑफ इनोवेशन इनक्युबेशन ॲण्ड इंटर प्राइस या चार समितीवर सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान, कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या यादीत अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शास्त्रज्ञांचा टक्का फारच कमी आहे. बहुतेक जण राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे अत्युच्च मानाच्या शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल डॉ. राजाराम माने यांचे कौतुक होत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, उपकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, रजिस्टार डॉ. सर्जेराव शिंदे, डीन डॉ. एल. एम. वाघमारे यांच्यासह मायणीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

शोधनिबंध, शोधपत्रिका, पुस्तकांचे लिखाण

डॉ. माने यांनी पंचाहत्तरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले आहे. ४०० शोधनिबंधांसह ३५१ शोधपत्रिका, चार आंतरराष्ट्रीय पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी सादर केलेल्या २० पेटंटचे पुनरावलोकन सुरू असून, मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती करण्याचे त्यांचे संशोधन जागतिक स्तरावर नावारूपास येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT