corona 
सातारा

जवळवाडीतील युवकांचा "जय हो'!

सकाळ वृत्तसेवा

मेढा (जि. सातारा) : कोरोनावर मात करण्यासाठी परगावी राहणारे बहुतांश स्थानिक ग्रामस्थ गावाला आले आहे. लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळाच सदुपयोग होत आहे. सामाजिक उपक्रमांनी ग्रामविकासाला साथ देत असल्याने जवळवाडीतील युवकांचा अनोखा उपक्रम सर्वत्र लॉकडाउनमध्ये कौतुकास्पद ठरत आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जवळवाडी (ता. जावळी) येथील युवकांनी सामाजिक अंतर राखत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून, "कोरोनावर करायचीय मात, ग्रामविकासालाही देऊ हात,' असे म्हणत गावाच्या विकासकार्यात हातभार लावत आदर्श निर्माण केला आहे. जवळवाडीतील युवक नेहमीच एकजुटीने अनेक उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण करतात. कोरोना रोगामुळे गेले दोन महिने देशात व राज्यात लॉकडाउन असून, मुंबईमध्ये असणारे तरुणसुद्धा गावीच आहेत. गावागावांत कोरोनामुळे चिंतेचे वातावरण असून, आणखी किती महिने असे घरात बसायला लागेल, हे कोणालाही माहीत नाही. गावागावांतील विकासकामे थांबली आहेत, अशा स्थितीत गावात एकत्र आलेला तरुण वर्ग ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी होत असून, हे कौतुकास्पद आहे. 

जवळवाडीतील युवकांनी एकत्र येत गावच्या सार्वजनिक विहिरीवर वाढलेली झाडे-झुडपे काढून स्वच्छता केली. विजेच्या तारांना लागणाऱ्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्या. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची टाकी साफ करण्यात आली. गावातील मंदिरे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात आली. या उपक्रमात गावातील अनेक युवक सहभागी झाले होते. या सर्व युवकांचे जवळवाडी सरपंच वर्षा जवळ, उपसरपंच शंकरराव जवळ व भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष सदाशिव जवळ यांनी कौतुक केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: रोज ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आजपासून मोठा बदल! पार्किंगसाठीही कठोर अट

Ajit Pawar : अजितदादा परत या! बारामती गहिवरली; महाराष्ट्र स्तब्ध, लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी निरोप

Latest Marathi News Live Update : कॅनॉट प्लेसमध्ये हाणामारीनंतर पोलिसांची कठोर कारवाई, टवाळखोरांची धिंड

Kolhapur Crime News : मोबाईलवर बोलताना अचानक मागून हल्ला, तरुणाचा पाठलाग करीत खून; गावची यात्रा सुरू असताना रक्तरंजीत घटना

Nagpur Bench : 'परस्पर सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही'; नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT