कऱ्हाड (जि. सातारा) ः एखाद्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हिंदू धर्मात लाकडांचा वापर केला जातो. मात्र, लाकडांचा खर्च वाचावा, पर्यावरण रक्षण व्हावे, या हेतून शेण्यांमध्ये दहन विधी करण्यावर नगरपालिकेच्या मासिक बैठकीत चर्चा होऊन शिक्कामोर्तब होणार आहे. एन्व्हायरो नेचर क्लबच्या मागणीवर पालिका सकारात्मक पावले उचलत आहे. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना मेडिकल सर्टिफिकेट किंवा नगरसेवकाची शिफारसही लागणार आहे. शेण्यांवर दहन करण्याचा निर्णय घेणारी कऱ्हाड पालिका जिल्ह्यातील पहिली ठरणार आहे.
मृतांवर शेण्यांवर अंत्यसंस्कार करावेत, अशी मागणी एन्व्हायरो क्लबने केल्यानंतर पालिकेत सकारात्मक चर्चा सुरू झाली. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्यासाठी सकारात्मक पावले उचलत चर्चा घडवली. नगरसेवकही सकारात्मक आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या येत्या सभेत मंजूरही केला जाणार आहे. आर्थिक बचतीसह पर्यावरण रक्षणासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. शेण्यांवर मृतांचे दहन करण्याचा निर्णय घेणारी कऱ्हाड पालिका जिल्ह्यातील पहिली पालिका ठरणार आहे. शेण्यांवरील अंत्यसंस्कारातून आर्थिक बचतीसह पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे. वृक्षतोडही घटणार आहे.
शहरात वर्षाला सरासरी 900 नागरिकांचा मृत्यू होते. त्यांच्यावर स्मशानभूमीत दहन करण्यासाठी जवळपास 325 टन लाकूड वापरले जाते. त्यासाठी 20 वर्षे वय असलेले सुमारे एक हजार 700 वृक्ष तोडले जातात. दहनाचा खर्च सुमारे तीन हजारांहून अधिक होता. त्या आर्थिक तोट्यासह पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. तो टाळण्यासाठी शेण्यांवर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत रूढ केली जाणार आहे. शेण्यांवर होणाऱ्या अंत्यसंस्कारातून केवळ एक हजार 150 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात 102 किलो शेण्यांचे 600 रुपये, लाकडाचे 400 रुपये व 150 रुपयांचा कापूर लागतो. त्यातून पर्यावरण रक्षणासह आर्थिकही बचत होताना दिसते. शेण्यांवर होणाऱ्या अंत्यसंस्काराचा खर्च पालिकेला पेलू शकतो. त्याबाबतचाही विचार पुढे येत आहे.
कोल्हापुरातून शेण्यांचा पुरवठा शक्य
कऱ्हाडमध्ये शेण्यांवर अंत्यसंस्कार झाल्यास त्यासाठी लागणारी शेण्या कोल्हापूर येथील एकजण पुरविण्यास तयार झाला आहे. त्याशिवाय काही कालवधीनंतर शहर व परिसरातील शेतकरीही शेण्यांचा पुरवठा करू शकतील. त्यातून पालिकेस शेण्यांचा पुरवठा होऊ शकतो. संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक फायदाही होऊ शकतो. यातील तिसरा फायदा म्हणजे भाकड गाईंचाही शेणींसाठी सांभाळ केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.