सातारा

सुखद धक्का : कऱ्हाडच्या नागरिकांनी घेतला मोकळा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : तालुक्‍यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना पालिकेच्या योग्य नियोजन व खबरदारीमुळे कोरोनाचा शहरात शिरकाव रोखण्यास यश मिळाले होते. मात्र, येथील वाखाण परिसरात, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील चार स्टाफसह मंगळवार पेठेत महिला असे सहा बाधित आढळले. त्यामुळे शहरात तीन ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांसह तेथील व्यवहारावर मर्यादा आल्या. मात्र, सहाही रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसर व वाखाण भागातील सूक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र यापूर्वीच उठवले असून, उर्वरित मंगळवार पेठेतील प्रतिबंधित क्षेत्र आज उठवले. त्यामुळे कोरोनामुक्ती पाठोपाठ शहर कंटेनमेंट झोनमुक्तही होत आहे.

शहरात वाखाण परिसरात एक महिला बाधित सापडली. त्यापाठोपाठ उपजिल्हा रुग्णालयातील चार नर्सही बाधित सापडल्याने खळबळ उडाली. त्यातील एका नर्सला दुधाचा रतिब घालणारी मंगळवार पेठेतील महिलाही बाधित झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही साखळी न वाढल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचा ताण कमी झाला. दरम्यान, संपूर्ण शहर प्रतिबंधित करण्याऐवजी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामुळे तो परिसर सील करण्याची कार्यवाही झाली. त्यानुसार वाखाण परिसरातील पहिला रुग्ण सापडल्यावर 30 एप्रिलला हा परिसर सील केला होता. त्यापाठोपाठ उपजिल्हा रुग्णालयाचा परिसरही सील झाला. चार नर्ससह वाखाणातील महिला कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला. त्यानंतर 23 मे रोजी या भागातील प्रतिबंधित क्षेत्र उठवण्याचा निर्णय प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर उत्तम दिघे यांनी घेतला. त्यामुळे केवळ मंगळवार पेठेतील एकमेव भाग प्रतिबंधित क्षेत्र राहिला होता. मंगळवार पेठेतील महिला रुग्णही बरी होऊन घरी आली आहे. त्यामुळे या भागातील प्रतिबंधित क्षेत्र केव्हा उठणार याबाबत लोकांत उत्सुकता होती. त्याचा कालावधी संपला असून, त्या भागातील प्रतिबंधित क्षेत्र उठवले. त्यामुळे कोरोनामुक्ती पाठोपाठ आता शहर कंटेनमेंट मुक्त होणार आहे.

त्यांनी ठेवले व्हॉटस्‌ऍप स्टेटस, वादांमुळे 56 जणांवर गुन्हा दाखल; 32 जणांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT