सातारा

भावा, आपल्या गावात कधी काय होईल सांगता येत नाही

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कऱ्हाड हे पश्‍चिम महाराष्ट्रातील एक संवेदनशील शहर आहे. येथील गुंडगिरीचा आलेखही सर्वश्रूतच आहे. कऱ्हाडमध्ये कधी काय होईल हे सांगताच येत नाही. त्यामुळे पोलिस दरबारीही कऱ्हाडची ओळख संवेदनशील शहर म्हणून झाली आहे. मध्यंतरी खुनाच्या घटनेनंतर शहराला वेठीस धरण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी लॉकडाउनमध्येही गुंडांवर वॉच ठेऊन त्यांची मिजास उतरवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शहरासह तालुक्‍यातील सामाजिक शांततेसाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्‍चितच बाजारपेठेसह शहराच्या स्वास्थ्यासाठी चांगले आहे.
सांगा... आम्ही जगायचे तरी कसे?
 
कऱ्हाड शहरासह तालुक्‍यातील गुंडगिरीचा चढता आलेख रोखण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे. शहरातील गुंडगिरी ही वर्चस्व वादासाठी, वाळूच्या पैशातून आणि खंडणी मागण्यावरून सुरू असते. ही कारणे पोलिसांनी गुंडावर केलेल्या कारवायातून समोर आली आहेत. वर्चस्ववादाची ठिणगी शहरात कधी पडेल हे सांगता येत नाही. त्या वादातूनच शहरात काही गुंडाचे खूनही झाले आहेत. त्यातील काहींना मोका लागला आहे, तर काही जण मोकाच्या रडारवर आहेत. मध्यंतरी पोलिस ठाण्यातच झालेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे पोलिसांचे कारवाई करण्यासाठी मनोबल खचले होते. पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाठीशीच उभा राहणारा अधिकारीच त्यात सफर झाल्याने कर्मचारीही कारवाई करण्यासाठी कुचराई करत होते. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन, संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभे राहून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलिस ठाण्यांची घडी बसवण्याचे काम केले आहे. त्यातूनच त्यांनी समन्वयातून कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गुंडांची मस्ती उतरण्यासाठी त्यांना सातत्याने पोलिस ठाण्यात आणून त्यांना पोलिसी खाक्‍या दाखवण्यासह त्यांच्यावर वॉच ठेवण्याची कार्यवाही सुरू ठेवली आहे. कऱ्हाडमधील गुंडगिरी ही सर्वश्रूत आहे. त्यामुळे कऱ्हाडमध्ये कधी काय होईल हे सांगताच येत नाही. त्यातूनच कऱ्हाडची पोलिस दरबारी संवेदनशील शहर म्हणून ओळख झाली आहे.
 येथे गाडी लावल्यास तुमच्या खिशाला पडेल चाट 

सोशल मीडियावरील भाई रडारवर 

सोशल मीडियावर दादा, भाई यासह काहींच्या टोपण नावाने पोस्ट करून त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्याचे प्रस्थ वाढले आहे. अशा पोस्टमुळे त्याला भुलून काही महाविद्यालयीन युवक त्या अभासी दुनियेकडे ओढले जात आहेत, हे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्याचा विचार करून पोलिसांनी आता अशा भाईंच्या पोस्ट करणाऱ्यांनाही टार्गेट केले आहे. संबंधितांची माहिती काढून त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्यांचा ब्रेनवॉश करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्याचाही चांगला परिणाम होताना दिसत आहे. 


कऱ्हाड शहरासह तालुक्‍यातील रेकॉर्डवरील गुंडांच्या हालचालीवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. दहशत माजवून कोणी गुंड कोणाला त्रास देत असेल, तर थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. नाव गोपनीय ठेऊन त्या गुंडावर कारवाई केली जाईल. 

सूरज गुरव , पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT