रावण गँगचे चौघे जेरबंद; पोलिसांची धाडसी कारवाई sakal
सातारा

कऱ्हाड : झटापटीनंतर रावण गँगचे चौघे जेरबंद; पोलिसांची धाडसी कारवाई

ताब्यात घेताना संबंधित संशयीतांनी पळुन जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : मोक्का कारवाईसाठी पोलिसांना पाहिजे असलेल्या पुण्यातील रावण गॅंगच्या चौघांसह आणखी एकास घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथून तालुका पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मदतीने धाडसी छापा टाकुन ताब्यात घेतले. ताब्यात घेताना संबंधित संशयीतांनी पळुन जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. संशयितांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सुरज चंद्रदत्त खपाले, ऋतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (दोघेही रा. रोकडे वस्ती, चिखली, पुणे) सचिन नितीन गायकवाड (रा. चिखली गावठाण, पुणे), अक्षय गोपीनाथ चव्हाण (रा. लक्ष्मी रोड, चिखली, पुणे) यांच्यासह बाळा उर्फ विकी उर्फ अनिरुद्ध राजू जाधव (रा. जाधव वस्ती, रावेर, पुणे) अशी संशयीतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

पोलिसांची माहिती अशी : खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यांमध्ये चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरज खपाले, मुंग्या रोकडे, सचिन गायकवाड व अक्षय चव्हाण यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई आहे. वाकड पोलिस ठाणे हद्दीत पिस्तूल तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये अनिरुद्ध जाधव पोलिसांना पाहिजे होता. या कारवाईनंतर संबंधित संशयीत पसार झाले होते. ते तालुक्यातील घारेवाडी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस नाईक सज्जन जगताप, अमित पवार, संग्राम फडतरे, पिंपरी चिंचवडचे सहाय्यक फौजदार पठाण, पोलीस श्री. मेदगे, श्री. मोहिते, श्री. कदम यांनी सापळा रचुन संबंधित संशयीत राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकला.

त्यादरम्यान संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. बराचवेळ संशयीत आणि पोलिसांत झटापट सुरू होती. त्यात काही संशयितांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. संबंधितापैकी चारजण पुण्यातील रावण गॅंग मधील असून संशयितांवर चाकण, चिखली, देहूरोड, खेड, निगडी, लोणीकंद आदी पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, दुखापत, पिस्तूल तस्करी असे गुन्हे दाखल आहेत. तालुका पोलिसांनी संशयितांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT