सातारा

याला म्हणायचं धाडस : तहसीलदारांच्या छाप्यात अलिशान माेटारीस तीन ट्रॅक्टर, जेसीबी जप्त

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः वांग नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्याची वाहतूक करणारी वाहने पांढरेचीवाडी (ता. कऱ्हाड) येथे तहसीलदारांच्या पथकाने ताब्यात घेतली. यावेळी सुमारे ५० ब्रास वाळू साठाही जप्त केला आहे. या कारवाईत वाळू साठ्यासह तीन ट्रॅक्टर, जेसीबी व एका अलिशान मोटारीसह दोन मोटारी असा ४२ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोळे येथील मंडलाधिकारी दत्तात्रय दीक्षित यांनी तालुका पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

सातारा जिल्ह्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत माहिती अशी, तालुक्‍यात काही ठिकाणी अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार प्रांताधिकारी उत्तम दिघे व तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके गुरुवारी रात्री तालुक्‍यात गस्त घालत होती. या वेळी तहसीलदारांचे पथक पांढरेचीवाडी येथे गेले. त्या वेळी त्यांना रस्त्याला संशयास्पद हालचाली आढळल्याने त्यांनी नदीपात्राच्या बाजूने माग काढला. या वेळी रस्त्यावर वाहने आडवी लावून रस्ता बंद असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे तहसीलदार श्री. वाकडे यांच्यासह पथकातील सचिन निकम, श्री. कोळेकर, परिविज्ञाधीन तहसीलदार आदींसह पाच जण तेथून चालत नदीच्या दिशेने गेले. या वेळी रस्त्यात ट्रॅक्‍टर आढळून आला, तसेच काही अंतरावर जेसीबी, ट्रॅक्‍टर व त्यालगत वाळूचा डेपोही दिसून आला. तहसीलदार श्री. वाकडे यांनी त्याबाबत गावातील पोलिस पाटील, तसेच पोलिसांनाही माहिती दिली. या कारवाईत तीन ट्रॅक्‍टर, जेसीबी व एका अलिशान मोटार (एमएच 50 एच 9000) व अन्य मोटार (एमएच 11 एडब्ल्यू 2115), तसेच सुमारे 50 ब्रास वाळू असा 42 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंढे येथील मौलासाब वल्ली याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. 


तलाठ्यांसह तहसीलदारांनीच ट्रॅक्‍टर ढकलून सुरू केला
 

रात्री बारा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. कारवाई दरम्यान जप्त केलेले तीन ट्रॅक्‍टर पांढरेचीवाडी येथून कऱ्हाड येथे पोलिस ठाण्यात आणायचे होते. मात्र, केवळ एकच चालक होता. त्यामुळे पथकातील एका तलाठ्यांसह तहसीलदार वाकडे यांनी नदीपात्रालगतचे ट्रॅक्‍टर ढकलून सुरू केले व ते गावापर्यंत आणले. त्यानंतर त्यातील दोन ट्रॅक्‍टर पोलिस ठाण्यापर्यंत आणण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT