Sugarcane Truck Sakal
सातारा

कऱ्हाड : ॲक्सल तुटल्यामुळे उसाने भरलेला ट्रक भरचौकात पलटी

मुख्य विजय दिवस चौकातच दुपारी अडीचच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक पलटी झाला.

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : येथील मुख्य विजय दिवस चौकातच दुपारी अडीचच्या सुमारास उसाने भरलेला ट्रक (Sugarcane Truck) पलटी झाला. त्यामुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली होती. अपघातात (Accident) सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो पलटी झाला. या भागातील वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.

पोलिसांनी सांगितले की, मायणीहून उसाने भरलेला ट्रक (क्रे. एमएच ०४ बीजी ३७४०) शहरातून उंडाळे येथील शुगर मिलकडे निघाला होता. विजय दिवस चौकात सिग्नलजवळ आल्यानंतर ट्रकचा पाठीमागील अॅक्सल तुटला. त्यामुळे झालेल्या तांत्रिक बिघाडाने ट्रक जागीच पलटी झाला. अॅक्सल तुटल्याने पाठीमागील दोन्ही चाके तुटून बाजूला गेली.

अपघात झाला असला तरी त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कऱ्हाड ते विटा मार्गावर हा अपघात झाला. तेथे विट्यासह पुसेसावळी, मसूर भागातून वाहने येतात. तेथे वाहनांचा थांबाही आहे. शेजारी छत्रपती शिवाजी महाराज व विठामाता हायस्कूल आहे. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र, सुदैवाने ट्रक सिग्नलवरच पलटी झाल्याने ट्रकचे नुकसान झाले असले तरी अन्य कोणतीही हानी झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT