खरीप पिके 
सातारा

जाणून घ्या... तब्बल 20 वर्षांनंतर कशी उगवली पिके जोमदार...

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : पूर्वीपासून विभागांमध्ये मे महिन्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण व्हायच्या. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला प्रारंभ व्हायचा आणि उन्हाळाभर राबून शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाची चीज व्हायचे. पिकाची उगवण उत्तम प्रकारे व्हायची आणि हंगामी यशस्वी व्हायचा. निसर्ग आणि त्याचे हे चक्र प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू होते. मात्र, सुमारे वीस वर्षांपासून या चक्रामध्ये बदल होत राहिल्याने शेतीचे सर्व वेळापत्रक कोलमडले. 

यावर्षी मात्र प्राचीन निसर्ग चक्राप्रमाणे सर्व गोष्टी घडत गेल्याने अगदी बरोबर वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येळगाव विभागात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच धूळवाफेवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिके जोमाने उगवली असून, दोनदा शेतकऱ्यांनी कोळपणी केली आहे. या परिसरातील पीक जोरदार आले आहे, तर उंडाळे विभागातील, ओंड, नांदगाव, साळशिरंबे, मनू, सवादे टाळगाव, जिंती परिसरात मे महिन्यामध्ये शेताची मशागत करून शेतामध्ये खत टाकून आडसाली लागणीसाठी सऱ्या पाडून त्यामध्ये तीन फुटी, साडेचार फूट सरी पडली आहे. त्यामध्ये आडसाली ऊस लागणी केल्या असून, जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सरीवर भुईमूग व सोयाबीनची टोकणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी सरी न पाडता मोकळ्या शेतात बैल व ट्रॅक्‍टरच्या साह्याने पेरणी केली आहे. सध्या टोकणीची कामे पूर्ण झाली असून, आडसाली लागणीतील कामे अंतिम टप्प्यात आहेत.

पाऊस वेळेवर आल्याने पेरणी, टोकणी झाली. डोंगरी भागात पिके तोऱ्यात असून, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब मोहिते म्हणाले, ""निसर्गचक्राप्रमाणे या वर्षी मॉन्सून दाखल झाला. त्याचा फायदा झाला असून, सोयाबीन, भुईमूगाची उगवण चांगली झाली आहे. वेळेवर पेरणी झाल्यामुळे उत्पन्न सुद्धा चांगले निघेल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अकोल्यात नगरसेवक पदाचा अर्ज भरताना उमेदवारानं आणली 5 हजार रुपयांची चिल्लर

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

SCROLL FOR NEXT