कोरेगाव नगरपंचायत Sakal
सातारा

कोरेगाव : मतदारांची पुरवणी यादी प्रसिद्ध; एकूण ४७१ जणांचा समावेश

एकूण मतदार संख्या १९ हजार ९०९ एवढी झाली आहे.

राजेंद्र वाघ

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीबाबत अक्षय बर्गे यांनी आक्षेप घेणारे निवेदन प्रांताधिकारी तथा कोरेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी व राज्याच्या निवडणूक आयोगाकडे दिल्याच्या पार्श्वभूमीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ४७१ मतदारांची पुरवणी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता एकूण मतदार संख्या १९ हजार ९०९ एवढी झाली आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आक्षेप घेणारे निवेदन प्राप्त होताच प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजया घाडगे यांनी बीएलओ यांना नोटीस काढली होती. या पार्श्वभूमीवर विजया घाडगे म्हणाल्या, ‘‘नावे वगळली गेली होती म्हणूनच पुरवणी यादी प्रसिद्ध केली आहे. चुका झाल्याचे आम्ही मान्यच करतो.

मृत व स्थलांतरितांची नावे वगळली आहेत; परंतु आम्ही कोणालाही मतदानापासून वंचित नव्हते केले. फक्त दुबार नाव येऊ नये, हा उद्देश होता. आता पुरवणी यादी प्रसिद्ध करून ती नावे ॲड केली आहेत.’’ विधानसभा मतदारसंघ यादीतील एकूण मतदार संख्या २० हजार १८८ आहे. मग नगरपंचायतीच्या मतदार यादीतील एकूण मतदार संख्या १९ हजार ९०९ आहे. ही तफावत कशी? यावर मुख्याधिकारी घाडगे म्हणाल्या, ‘‘मागच्या इलेक्शनची आम्ही फाइल काढली. त्यामध्ये भाग नऊ हा पूर्णतः गोळेवाडीचा आहे व भाग दहा हा अंशतः गोळेवाडी व कोरेगाव शहराचा आहे. गोळेवाडी हद्दीतील जी नावे आहेत, असे आम्हाला वाटते, ती नावे आम्ही वगळली आहेत. त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नावे आमच्या यादीत घेतली असती, तर पुन्हा आमच्यावर आरोप झाले असते.’’

डुप्लिकेट नावांसाठी खटाटोप कोणाचा?

मुख्याधिकारी घाडगे म्हणाल्या, ‘‘काही लोकांनी दुसऱ्या गावातील लोकांचे खोटे आयकार्ड बनवून त्यांची डुप्लिकेट नावे यादीमध्ये घातली होती, ती नावे आम्ही चांगल्या हेतूने वगळली होती; परंतु ते अधिकार आम्हाला नाहीत, तर महसूलला आहेत.’’ त्यावरून डुप्लिकेट नावांसाठी खटाटोप करणारे कोण कोण आहेतच? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT