मराठवाडी
मराठवाडी  
सातारा

टंचाईला पुरून उरलं "ते' पाणी...

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठवाडीजवळ वांग नदीवर 1997 मध्ये सुरू झालेले 2.73 टीएमसी क्षमतेच्या धरणाचे बांधकाम सध्या पूर्णत्वाकडे आहे. दहा वर्षांपूर्वी अंशतः घळभरणी केल्यानंतर त्यात प्रतिवर्षी 0.60 टीएमसी पाणीसाठा होत होता. मात्र गेल्या वर्षी सांडव्याचे बांधकाम सुरू केल्याने तो जवळपास दुप्पट म्हणजे 1.05 टीएमसीवर पोचला. पाणीसाठ्यात वाढ झाल्याने ओघाने आवर्तनेही तीनवरून पाचवर पोचली असून, नुकतेच या हंगामातील शेवटचे आवर्तन सुरू झाल्याचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे व सहायक अभियंता शरद पवार यांनी सांगितले. 

टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात मराठवाडी धरणातील विविध गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन झाल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडविल्यावर प्रतिवर्षी एक टीएमसी पाणी टेंभूसाठी देण्यात येणार आहे. तूर्तास यावर्षी साधारणपणे अर्धा टीएमसी पाणी तिकडे पोचविल्याचे सांगण्यात आले.

मराठवाडी धरणाचे लाभक्षेत्र कऱ्हाड- पाटण तालुक्‍यांतील 47 गावांत असून, वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीचे दहा बंधारे बांधून त्यात पाणी अडविण्याचे नियोजन केलेले आहे. यामधील नऊ बंधारे बांधून तयार असून, भोसगाव- मोरेवाडीच्या बंधाऱ्याचे बांधकाम रखडले आहे. गेल्या वर्षीपर्यंत लाभक्षेत्रातील सुमारे 5200 हेक्‍टर क्षेत्र मराठवाडी धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आले होते.

यावर्षी त्यात आणखी हजार हेक्‍टरची भर पडली आहे. लाभ क्षेत्रातील शेतीबरोबरच अनेक गावांत असलेल्या नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींनाही मराठवाडीच्या पाण्याचा लाभ होत आहे. सध्या धरणातून 190 क्‍युसेकने विसर्ग सुरू असून, पुढील काही दिवस तो कायम राहणार आहे. तातडीच्या नियोजनासाठीचा साठा शिल्लक ठेऊन उर्वरित पाणी धरणातून सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मराठवाडी धरण उशाला असल्याने आम्ही लाभक्षेत्रातील शेतकरी त्याच्या भरवशावर निवांत आहोत. पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळे बागायती शेतीचे गणित जुळत आहे. 
- डी. एस. पाटील, शेतकरी (गुढे, ता. पाटण) 

टंचाईच्या काळात शेतकऱ्यांची मागणी आल्यावर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. या हंगामातील पाचवे आणि शेवटचे आवर्तन सध्या सुरू आहे. पाण्याची हमी असल्याने बागायती क्षेत्र वाढत आहे. 
- सुरेन हिरे 

कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT