सातारा

शिंदेवाडीत बिबट्याचा थरार; कुत्र्याला ठार करून लटकवले जांभळीच्या झाडावर

विलास खबाले

विंग (जि. सातारा) : येथून जवळच शिंदेवाडी परिसरात बिबट्याने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. तेथील भरवस्तीत घुसून त्याने हल्ला चढवत एका पाळीव कुत्र्यास ठार मारून त्यास झाडावर लटकवले. परवा रात्री घडलेला या प्रकारामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण त्यामुळे आहे.

शिंदेवाडी परिसरात बिबट्याचा वावर नित्याचा बनला आहे. तेथील विविध परिसरात त्याच्याकडून हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. विशेषतः पाळीव प्राण्यांना त्याने लक्ष केले आहे. भरवस्तीत घुसण्यापर्यंत त्याची मजल गेली आहे. परवा रात्री एका पाळीव कुत्र्यास त्याने ठार मारले. तेथील शिवाजी दादू शिंदे या शेतकऱ्याचे कुत्रे होते. ही शिकार बिबट्याने अक्षरशः झाडावर नेऊन लटकवली होती. परवा रात्री घडलेला प्रकार ग्रामस्थांच्या काल निदर्शनास आल्यानंतर घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तत्पूर्वी त्या वस्तीत बिबट्याने पाळीव प्राण्यावर अनेकदा हल्ले चढवले आहेत.

दोन वर्षांपूर्वी तेथील एका शेतकऱ्याच्या चार शेळ्या ठार त्याने केल्या होत्या. त्यानंतर अलीकडे त्या गावठाण परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन नेहमीच घडत होते. पैलवान तानाजी शिंदे, उत्तम शिंदे यांनी त्यास ठिकठिकाणी पाहिले होते. त्यानंतर परवा रात्री शिकारीचा डाव त्याने साधला. एका पाळीव कुत्र्यास ठार मारले. गंजीवर ते झोपलेले होते. हल्ल्यानंतर त्यास फरफडत नेऊन एका जांभळीच्या झाडावर नेऊन लटकवले. घटनास्थळावर झाडाच्या खोडावर त्याच्या पायाच्या नख्या ओरखडल्याचे दिसत आहे. संबंधितांनी शोध घेतल्यानंतर काल हा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे घबराहट निर्माण झाली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. ग्रामस्थांनी बंदोबस्ताची आग्रही मागणी आता केली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT