sakal
सातारा

सातारा: जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात बिबट्या

वन विभागाची शोध मोहीम; श्‍‍वानपथक दाखल

सकाळ वृत्तसेवा

सातारा: येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर आज रात्री वन विभागाच्‍या पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढत त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. अंधार, पावसामुळे वन विभागाने राबविलेल्‍या शोध मोहिमेत अडचणी येत होत्‍या. रात्री दहापर्यंत विविध ठिकाणी शोध घेतल्‍यानंतरही बिबट्याचा मागमूस लागू शकला नव्‍हता. याठिकाणाहून बिबट्याचा माग काढण्‍यासाठी सातारा पोलिस दलाचे श्‍‍वानपथक मागविण्‍यात आले होते.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सुरक्षारक्षकास कार्यालयाच्या मुख्‍य दरवाजाजवळील झाडाझुडपात हालचाली जाणवल्‍या. त्यामुळे त्‍याने बॅटरीच्‍या प्रकाशात शोध घेतला असता त्‍याला झुडपात बिबट्या असल्‍याचे जाणवले. यामुळे त्‍याने याची माहिती वरिष्‍ठांना दिली. यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयातील वरिष्‍ठांनी याची माहिती शहर पोलिसांना, तसेच वन विभागास दिली. माहिती मिळाल्‍यानंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले.

त्‍यांनी माहिती घेत बिबट्याचा माग काढण्‍याचे काम सुरू केले. अंधार, पावसामुळे या कामात अडथळा येत होता. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्‍याने सर्वत्र घबराट पसरली. वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांना योग्‍य ती खबरदारीच्‍या, तसेच बिबट्या दिसल्‍यास त्‍याची माहिती देण्‍याचे आवाहन केले.

सगळ्यात पहिल्‍यांदा बिबट्या दिसलेल्‍या ठिकाणाहून त्‍याचा माग काढण्‍यासाठी सातारा पोलिस दलाचे श्‍‍वानपथक मागविण्‍यात आले होते. मात्र, त्‍यालाही बिबट्याचा माग काढण्‍यात अडचणी येत होत्‍या. रात्री १२ पर्यंत बिबट्याची शोधमोहीम वन विभागाने राबवली. मात्र, त्‍यांना बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. यामुळे ती मोहीम थांबविण्‍याचा निर्णय घेत वन विभागाने त्‍याठिकाणी कर्मचाऱ्यांची तैनाती तशीच ठेवली.

अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍याच्‍या पिछाडीस असणाऱ्या सुळाचा ओढा परिसरातून बिबट्या नागरी वस्‍तीत घुसला असण्‍याचा अंदाज वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्तवत आहेत. रात्री थांबविलेली शोध मोहीम पहाटेच्‍या सुमारास पुन्‍हा सुरू करण्‍यात येणार असल्‍याची माहिती वन अधिकारी निवृत्ती चव्‍हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT