karad
karad 
सातारा

कऱ्हाडातील "त्या' 222 कुटुंबांचा जीव टांगणीला

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः कोयना- कृष्णा नद्यांचे पाणी वाढत महापुराच्या दिशेने जाते. तसतशी त्या दोन्ही नदी काठावरील शहरी भागातील कुटुंबांतील अस्वस्थता वाढते. शहरातील तब्बल 222 पेक्षाही जास्त कुटुंबांचे स्थलांतर अर्धवट स्थितीत आहे. 13 वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला, तरी अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेने काहींचे स्थलांतर केले आहे. मात्र, तेही स्थलांतर अर्धवटच स्थितीत आहे. 

संततधार पाऊस व कोयना धरणातून नदीत पाणी सोडले, की शहरात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पालिकेच्या मदतीने आजअखेर विविध ठिकाणची सुमारे 222 हून अधिक कुटुंबांचे नेहमीच स्थलांतर होते. मागील वर्षी तितकीच कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केली होती. त्यांच्या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था पालिकेच्या शाळांच्या इमारतीसह कृष्णाबाई मंगल कार्यालय व पालकर शाळेत केली जाते. मागील वर्षी सुमारे 790 हून अधिक लोकांचे स्थलांतर झाले होते. पूरस्थितीत पालिका मदत करते. मात्र, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नदीकाठावरील नागरिक पुराची भीती डोक्‍यावर घेऊन जगतात. त्या कुटुंबांची भीती संपणार तरी कधी, हाच खरा प्रश्न आहे. घरकाम करणाऱ्या गवंडी कामासह रोजंदारीवरील काम करणाऱ्यांचे वास्तव्य त्या वस्तीत आहे. 

प्रत्येक वर्षी पूर आला, की धावपळ उडते. 13 वर्षांपासून याच स्थितीशी हे लोक सामना करत आहेत. त्या वेळी पालिकेने घरकुलासाठी अर्ज भरून घेतले होते. त्याबाबत काहीही निर्णय नाही. काही कुटुंबांना बारा डबरे परिसरात खोल्या बांधून दिल्या. मात्र, कुटुंब मोठे तर खोल्या लहान झाल्या आहेत. त्यामुळे हे स्थलांतरही अपुरे ठरते आहे. तिथे राहण्यास गेलेल्यांमध्ये दोन ते चार मुले आहेत, त्यांनी काय करायचे अशा प्रश्न आहे. घरातील आई- वडिलांनी कुणासोबत राहायचे हाच प्रश्न आहे. त्यामुळे तेथील दहा बाय दहाच्या खोल्यांची जागा पुरणार नसल्याने स्थलांतरित होणाऱ्या पैकी कोणीही तिकडे गेले नाही. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT