Sunil Mane sakal
सातारा

Satara News : संघर्षाच्या काळात राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांची नाराजी मिटवण्याचे नेत्यांपुढे आव्हान

राष्ट्रवादी कॉग्रेसचे (शरदचंद्र पवार) सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना सातारा लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे.

हेमंत पवार

सातारा - राष्ट्रवादी कॉग्रेसचे (शरदचंद्र पवार) सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना सातारा लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा गुरुवारी सातारा जिल्ह्यात दौरा झाला. त्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. माने कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नाराजीला पुष्टी मिळाली.

त्यांची यापूर्वी एकदा विधानपरिषदेला आणि सध्या लोकसभेला नावाची चर्चा होऊनही हुलकावणी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील संघर्षाच्या काळात महायुतीच्या उमेदवाराला सामोरे जाताना राष्ट्रवादी पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यावरच भर द्यावा लागेल, असे दिसते.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर पालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सुनील माने हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. अत्यंत कमी वयात ते निवडून आल्यानंतर त्यांचा राजकीय उदय झाला. ते त्यावेळी डॉ. शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. राष्ट्रवादीच्या माध्यमातून १९९९ पासून त्यांनी रहिमतपूर पालिकेत एकहाती सत्ता कायम राखली आहे.

त्यांनी काही शैक्षणिक संस्थाही सुरू केल्या आहेत. त्याद्वारे त्यांचा संपर्क आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून माने यांनी सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. राष्ट्रवादी एकत्रित असताना झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी प्रभाकर घार्गेंचे नाव पुढे आले. त्यामुळे आमदारकीने त्यांना हुलकावणी दिली.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक न लढविण्याचे ठरवले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव थेट जाहीर न करता शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची? याच्या चर्चेसाठी मुंबईत बैठक घेतली. त्यात सुनील मानेंच्या नावाची चर्चा झाली.

लोकप्रतिनिधींनीही त्यांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून पुढे केले. त्यातच राष्ट्रवादीकडून श्री. माने, सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांचीही नावे चर्चेत आली. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांनी आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली. काल जिल्ह्यात स्वागत दौरा झाला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री. माने यांची उपस्थिती आवश्यक होती.

कसोटीच्या काळात...

सातारा लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीकडून जोर लावण्यात आला आहे. त्यांचा उमेदवार अजूनही जाहीर नसला, तरी उदयनराजे यांनी जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे. महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या कसेाटीच्या काळात उमेदवारीवरून नाराज झालेल्या सुनील मानेंची नाराजी दूर करण्याचे पक्षासमोर आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: होमगार्ड तरुणीचा खून मैत्रिणीकडून,मृतदेह फेकण्यासाठी घेतली मुलाची मदत

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT